🌟जिंतूर येथे दिव्यांग तपासणी व कृत्रिम अवयव शिबिर.....!


🌟जन्म जात अपंगांसाठी निशुल्क तपासणी करून ऑपरेशन साठी योग्य वेळेस उदयपूर येथे ऑपरेशन साठी पाठवण्यात येणार🌟 


जिंतूर प्रतिनीधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय ग्रीन पार्क 2 येथे स्वर्गीय आयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट "राम- अयोध्या'' येलदरी रोड जिंतूर द्वारा राम नारायणजी तोष्णीवाल यांचे पंचम पुण्य स्मरण प्रित्यर्थ जिंतूर शहरात दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी शनिवार सकाळी 10:00 ते 4:00 वाजेपर्यंत जन्म जात अपंगांसाठी निशुल्क तपासणी करून ऑपरेशन साठी योग्य वेळेस उदयपूर येथे ऑपरेशन साठी पाठवण्यात येणार असून अपघातात आलेली अपंगत्व किंवा अंगवेडी वाकडे त्यासाठी शिबिरात कृत्रिम अवयवासाठी रजिस्ट्रेशन केल्या जाणार असून सर्व दिवांगांनी शिबिरात येण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स,  अपंगत्व दिसेल असे 2 फोटो व अपंग प्रमाणपत्र सोबत आणावे त्याचबरोबर या शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग स्त्री-पुरुषांनी व बालकांनी उपस्थित राहावे असे आव्हान शिबीर संयोजक ब्रिज गोपाल तोष्णीवाल, गोविंदप्रसाद तोष्णीवाल, रमणतोष्णीवाल, यांनी केले असून या शिबिरासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गजानन घुगे, श्रीपाद तळणीकर, गजानन तिखे यांच्याशी संपर्क करावा अशीही आव्हान करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या