🌟पुर्णेतील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातर्फे बॅडमिंटन व फिटनेस शिबिराचे आयोजन.....!


🌟या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आण्णा एकलारे यांनी केले आहे🌟

पुर्णा (दि.२१ एप्रिल) - पुर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय व क्रिडा व युवक सेवा संचनालय,परभणी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात बॅडमिंटन व फिटनेस शिबिराचे आयोजन दि.२२ एप्रिल २०२३ ते दि. ०७ मे २०२३ या दरम्यान करण्यात आलेले आहे.


या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आण्णा एकलारे, संस्थेचे सचिव अमृतराजजी कदम, संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंदरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार,उपप्राचार्य डॉ संजय दळवी यांनी केले आहे हे शिबिर श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे क्रिडाशिक्षक सतीश बरकुंटे,पूर्णा तालुका क्रीडा अधिकारी धरमसिंग बायस,शंभु गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या