🌟जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत....!


🌟मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर गटाचा 14 जागांवर दणदणीत विजय तर मा.आ.विजय भांबळे गटाचा केवळ 4 जागांवर विजय🌟

जिंतूर (दि.29 एप्रिल) : जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आज शनिवार दि.29 एप्रिल रोजी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने स्पष्ट असे बहुमत प्राप्त केले असून या बाजार समितीत बोर्डीकर गटाने 18 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.

            जिंतूर येथे आज शनिवारी सकाळी 08-00 वाजता मत मोजणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसह त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्रासमोर मोठ्या संख्येने जमा झाले होते. हळूहळू मतमोजणीचा निकाल बाहेर येवू लागला तेव्हा या निवडणूकीत बोर्डीकर गट स्पष्ट बहुमत मिळवेल, असे चित्र निर्माण झाले. त्याप्रमाणेच अंतीम टप्प्यात निकाल जाहीर झाले.

                या निवडणूकीत सहकारी संस्था मतदारसंघांतर्गत संचालकांच्या 11 जागा व हमाल मापाडी मतदारसंघांतर्गत 1, तसेच व्यापारी मतदारसंघांतर्गत 2 अशा एकूण 14 संचालकांच्या जागा बोर्डीकर गट हस्तगत केल्या आहेत. तर माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ग्रामपंचायत मतदारसंघांतर्गत 4 जागा पटकावल्या आहेत.

* निवडणूकीचा अंतीम निकाल पुढीलप्रमाणे :-

              सहकारी संस्था मतदारसंघात पांडुरंग सोमा आडे 325, गंगाधर वामनराव कदम 339, रामराव नारायणराव घुगे 329, महादेव उर्फ प्रमोद माणिकराव चव्हाण 325, सुंदर शंकरराव चव्हाण 327, रामभाऊ गोपीचंद जाधव 322, कृष्णकांत शिवाजीराव मोरे हे 325 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात 552 मते वैध तर 24 मते अवैध ठरली. महिला राखीव मतदारसंघातून दुर्गाबाई गंगाधरराव कांगणे यांनी 345, रोहिणी रमेशराव ढवळे 331 मते मिळवून विजय पटकावला. या मतदारसंघात 567 वैध व 9 मते बाद ठरली. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून विमलबाई कैलासराव लकडे यांनी 341 मते मिळवून विजय पटकावला. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात गजानन हरिभाऊ वर्‍हाड यांनी 345 मते घेवून विजय पटकाविला.  ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण गटात गणेश सदाशिव इलग 444 तर विश्‍वनाथराव प्रभाकर राठोड यांनी 437 मते घेवून विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून  रामराव अर्जूनराव उबाळे यांनी 436 मते घेवून विजय मिळवला. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून मनोज मुंजाभाऊ थिटे हे 447 मते घेवून विजयी झाले. व्यापारी मतदारसंघातून रमन गिरधारीलाल तोष्णीवाल यांनी 41 तर सचिन प्रल्हादराव देवकर यांनी 36 मते घेवून विजय पटकाविला. हमाल व तोलारी मतदारसंघात नामदेव कठाळू मोहिते यांनी 17 मते मिळवून विजय पटकाविला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव भोसले यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या