🌟‘शासकीय योजनांची जत्रा’ कार्यक्रमातंर्गत सर्व विभागांन आराखडे तयार करावेत - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या बोलत होत्या🌟

परभणी (दि.२८ एप्रिल) :  ‘शासकीय योजनांची जत्रा’ कार्यक्रमातंर्गत सर्व विभागांनी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या  बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांची उपस्थिती होती. 



‘शासकीय योजनांची जत्रा’ हा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थीना विविध योजनेचे लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी विविध विभागांनी योजनानिहाय जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय आराखडे तयार करुन सोमवार पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सर्व विभाग प्रमुखाना दिल्या. 

जिल्हा व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करावेत. तसेच तालूकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी तर  ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आदींच्या बैठका घेवून त्यांना या कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यावी. तसेच सर्व संबंधीत विभागांनी त्यांच्याशी संबंधीत योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी व्यापक प्रचार प्रसध्दी करावी असे ही त्या म्हणाल्या यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या