🌟प्रपंचाला विरोध न करता मानवी जीवनाला उच्च पदावर नेणारे आदर्श म्हणजे प्रसायदान - चैतन्यमहाराज देगलूरकर


🌟प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प.श्रीगुरु चैत्यनमहाराज देगलूकर यांच्या 'पसायदान' या विषयावरील प्रवचनात ते बोलत 🌟

सेलू (दि.06 एप्रिल) - पसायदान हे मानवी जीवनाला मिळालेले अमृत आहे.या पसायदानामधून मानवी जीवनाला मिळणारे मूल्य अमृत आहे.या पसायदानाला विरोध न करता मानवाच्या जीवनाला उच्च पदावर नेऊन ठेवणारे आदर्श म्हणजे पसायदान आहे असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.येथील साईबाबा मंदिरातील भव्य सभागृहात पंढरपूर येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प.श्रीगुरु चैत्यनमहाराज देगलूकर यांच्या " पसायदान " या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते.

येथील वसंत प्रतिष्ठान तथा परिवाराच्या वतीने " पसायदान " या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला यशवंत चारठाणकर यांच्या वतीने" समाधी साधन संजीवणू नाम" हे गीत सादर केले.यावेळी तबला शिवाजी पाठक ,पेटी शंतनू पथक आणि प्रकाश सुरवसे यांनी साथ दिली.

यावेळी ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालुरकर,उद्योजक तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश खारकर,ऍड.उमेश खारकर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,हेमंत आडळकर,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,मारोती महाराज वाघ,मंचकराव वाघ,हेंगडे गुरुजी,दत्तराव पावडे,ह.भ।प.भगवान महाराज डासाळकर आदींनी श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूकर यांचे स्वागत केले.

पुढे बोलतांना, पसायदानाचे पसायदान रुपी प्रवचनात निरुपणात  तिसऱ्या ओवीबाबत बोलतांना चैतन्य महाराज देगलूरकर  यांनी स्पष्ट केले की,प्रपंचाला विरोध न करता मानवाच्या जीवनाला  उच्च पदावर नेऊन ठेवणारे आदर्श म्हणजे पसायदान होय पसायदान म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली मागणी आहे समाजाला सुधारण्यासाठी  प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीला सुधारणे गरजेचे असते .साध्याची मागणी न करता साधनाची मागणी महाराजांनी केलेली आहे .

स्वकष्टाने कमावलेले हजार रुपये देखील आयत्या मिळालेल्या लाखो रुपयांच्या तुलनेत किती तरी जास्त आहे .समाजाला प्रगतिशील व सजग बनवायचे असेल तर कष्टा विना मिळवण्याची शिकवण देता कामा नये .संत तत्वज्ञान नुसते सांगत नसतात तर स्वतःच्या आचरणात आणतात .

कष्टाने प्राप्त केलेल्या वस्तूचे मूल्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे .वस्तू जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत त्याचे मूल्य असते परंतु प्राप्ती नंतर त्याचे मूल्य कमी होते अशा वस्तूच्या प्राप्ती साठी जीवन घालवणे याला काहींच अर्थ नाही .प्राप्ती आणि अप्राप्ती याचा सांधा म्हणजे प्रयत्न असतो .अप्राप्त वस्तूची मागणी प्रयत्नाने करावी व त्यामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाची व अडथळ्यांची कल्पना प्रत्येकाला आली पाहिजे  .

समाजाला प्रगतिशील बनवायचे असेल तर केवळ कष्टाचा उपदेश आवश्यक असतो.सर्व संत समाजाने कष्टाला महत्व दिले आहे.सर्व शास्त्राची मूळ ही तत्वज्ञानात सापडतात.जगात असा कोणताच विचार नाही ज्याची चर्चा तुकोबारायांच्या गाथेत नाही.संतांनी माणसाच्या विकासासाठी कर्माची जोड लावली आहे.

माणसाचे जीवन सुंदर करण्यासाठी आवश्यक काय असेल तर ते पसायदान ,खलत्व आणि दृष्टा दृष्टाच्या व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवल्या आहेत. पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाच्या विकासासाठी मागितलेलं मागण आहे.सकल समाजाच्या उन्नती साठी मागितलेलं हे मागणं आहे.सकल समाजाला बदलणं शक्य नसतं परंतु या पसायदान मधून ज्ञानेश्वर महाराजांनी ही मागणी केली आहे.

मानवाच्या विकासासाठी एक व्यापक मागणी पसायदान मधून व्यक्त करण्यात आली आहे.ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदान मधून साधन परंपरेतून केली आहे." जो जे वांच्छील तो ते राहो प्राणिजात " अशी मागणी केली आहे.आजपासून 3 दिवस ही प्रवचन मालिका सुरू राहणार असून या 3 दिवस " पसायदान " या विषयावर श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूकर हे प्रवचन देणार आहेत.यावेळी माजी आ.विजय भांबळे,जिल्हा परिषदेचे तथा जी.प.सदस्य अशोक काकडे यांनी देगलूकर महाराज यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले.पसायदानाने प्रवाचनाची सांगता शंतनू पाठक यांच्या वाणीतून सादर झालेल्या झाली.सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या