🌟पुर्णा तालुक्यातील अवकाळी पाऊसासह झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा....!


🌟स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

🌟तालुक्यातील चुडावा कावलगाव गौर लिमला ताडकळस परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान🌟 

पुर्णा (दि.२६ एप्रिल)  तालुक्यातील चुडावा, गौर ताडकळस, लिमलासह, कावलगाव मध्ये काल मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी दुपारी ०२:०० वाजाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली असून या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

पूर्णा तालुक्यातील चुडावा कावलगाव गौर लिमला ताडकळस मध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचे बागायती पिकाचे फळबागायतीचे नुकसान झाले असून या नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना फळबागायती १ लाख रुपये व २०२१ ते २०२२ वाढीव पिक विमा अनुदान चालू बाकीदार ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे तसेच चुडावा कावलगाव, गौर, लिमला, ताडकळस सह पूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पूर्णा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दिगंबरराव देसाई यांच्या वतीने पूर्णा तहसीलदार बोथीकर यांना निवेदन देण्यात आले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या