🌟पुर्णेतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नाम,जप,यज्ञ व श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याला उत्साहात सुरूवात....!


🌟भाविक भक्तांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रातर्फे करण्यांत आले🌟 


पुर्णा (दि.१४ एप्रिल) - पुर्णा शहरातील अलंकारनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.११ एप्रिल ते मंगळवार १८ एप्रिल २०२३ या सप्ताहात भव्य श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या सप्ताहात दररोज सुमारे १०१ पारायण कर्ते भाविक मोठ्या भक्तीभावाने पारायण करत आहेत तसेच नाम जप,आणि यज्ञ सोहळा सुद्धा दररोज सुरू आहे, पहिल्या दिवशी पालखी सोहळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनतर आता दि.११ एप्रिल २०२३ पासून उर्वरित कार्यक्रम भाविकांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत संपन्न होत आहेत मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी महानैवद्य अर्पण करून ह्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रातर्फे करण्यांत आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या