🌟परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांना युडीआयडी कार्ड वितरणास सुरुवात....!


🌟जिल्हा परिषदेद्वारे उपक्रम : 100 दिवस चालणार अभियान🌟

परभणी (दि.01 एप्रिल) : विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांगांना युडीआयडी कार्ड मिळण्यासाठी ‘100 दिवस दिव्यांगांसाठी’ उपक्रमाची सुरुवात शनिवार दि.1 एप्रिल पासून करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिली.


           जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांसाठी युडीआयडी कार्ड मिळण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेतून तालुका निहाय शिबिराचे आयोजन सकाळी 8.30 ते दुपारी 1.00 यावेळेत करण्यात आले आहे.

          3 एप्रिल रोजी जिंतूर तालुक्यातील बेलखेडा, बेलुरा, भिलज, बामणी, भोसी, बोर्डी सेलू तालुक्यातील बोथी, ब्राह्मणगाव डोईफोडे, ब्राह्मणगाव खुर्द, ब्रह्मवाकडी, चिकलठाणा खुर्द, चिकलठाणा बु., चिमणगाव गंगाखेड, सोनपेठ व पालम तालुक्यातील भीमला तांडा, भोटी, भोटी तांडा, बोर्डा परभणी, मानवत, पाथरी, पूर्णा तालुक्यातील असोला, बाभूळगाव या गावातील दिव्यांगांना युडीआयडी कार्ड उपविभागीय रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात वितरीत होणार आहेत.

           ज्या दिव्यांगांकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाही आशांसाठी हे शिबीर आयोजित केले आहे. दिव्यांग व्यक्तींना शिबिरात घेऊन येण्यापूर्वी त्यांची स्वावलंबन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिराच्या ठिकाणी फक्त नोंद झालेल्या दिव्यांगांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  गावनिहाय दिव्यांगाची यादी (ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही असे) तालुकास्तरावर संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना यादी प्राप्त झाली नाही त्यांनी कृपया समाज कल्याण अधिकारी शिवानंद मीनगिरे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. इतर कर्णबधिर, गतिमंद, नेत्रदोष व इतर बाबीसाठी जिल्हा रुग्णालय परभणी येथे तपासणीचे व्यवस्था करण्यात आलेली आहे.त्यामुळे अस्थिव्यंग/हाडाशी संबंधित दिव्यांगांशिवाय इतर दिव्यांगांना ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन येऊ नये, असे आवाहन सीईओ खांडेकर यांनी केले आहे.

           शारीरिक अस्थिव्यंग नागरिकांनी जिंतूर, सेलू, गंगाखेड येथील उपविभागीय रुग्णालयात तर इतर दिव्यांग नागरीकांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात युडीआयडी कार्ड वितरीत करण्यात येणार आहे, अशेी माहिती सीईओ खांडेकर यांनी दिली. गावातील आशाताईंनी दिव्यांगांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी आपल्या ऑपरेटरला मदत करावी तसेच सर्व ग्रामसेवकांनी दिव्यांगांना युडीआयडी शिबिराच्या ठिकाणी घेऊन जावे, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या