🌟कांदेवाडी येथील शिक्षणसम्राट शिक्षण क्षेत्रातील तारा कै.शिवाजीराव रामभाऊ खाडे.....!


🌟यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा लेखातून घेतलेला थोडक्यात आढावा🌟

"कांदेवाडी येथील शिक्षणसम्राट,शिक्षण क्षेत्रातील तारा कै. शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा लेखातून घेतलेला थोडक्यात आढावा."

           धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भुतपुर्व शाखाधिकारी शिवाजीराव खाडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परळी, आंबेजोगाई, बीड, घाटनांदुर व धर्मापुरी शाखेच्या व्यवस्थापक पदी त्यांनी काम केले होते . सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. रामायणाचे ते गाढे अभ्यासक होते. कांदेवाडी येथील पहिले पदवीधर म्हणून त्यांची विशेष ओळख होती. धारूरसह परळी व परिसरात जुने ज्येष्ठ व्यक्तीमत्व म्हणुन प्रसिध्द होते. या बरोबरच शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन ते परिचित होते.  तसेच धार्मिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रासह अन्य कार्यात अग्रेसर म्हणून धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यात सुपरिचित असणारे व्यक्तीमत्व म्हणून कै.शिवाजीराव खाडे यांचे ओळख होती.   

   आजच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात निर्मिती व सर्जनशीलतेला प्राधान्य देऊन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारशील व कौशल्यपूर्ण सक्षम पिढी घडविण्याच्या उदात्त हेतूने परळीच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या नाविण्याचा ठसा  कै. शिवाजीराव रामभाऊ खाडे उमटविला.एखादी कल्पना मनात रुजली व ती कृतीत आणण्यासाठी, सततचा संघर्ष करण्याची जिद्द ही कायम ठेवलेली त्यांच्या यशस्वी वाटचालीतून दिसून येते. श्रीमंतीची मक्तेदारी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची कवाडे ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोर गरीब मुलांना सहजा सहज  साध्य उपलब्ध व्हावीत ही आशा बाळगून, शिक्षण संस्था काढली. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची खरी तळमळ होय. शैक्षणिक व सांस्कृतीक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत त्यांनी उमटविला आहे. या यशामागे त्यांच्या ठायी असणाऱ्या विशेष नेतृत्वगुणांचा संदर्भ तसेच आई-वडिलांची समर्थ साथ प्रेरणा दिसून येते.

कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्था संचलित अनेक शिक्षण संस्था ज्ञानदानाचे सेवा करतात. यामध्ये                                                   कै. रामभाऊ (आण्णा) खाडे अध्यापक विद्यालय, दिंद्रुड ता. माजलगाव,यश कनिष्ठ महाविद्यालय, नंदनज ता. परळी ववैजनाथ जि. बीड,यश इंटरनॅशनल (CBSC ) स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज, दिंद्रुड ता. माजलगाव जि. बीड,यश डी.एल.एम.टी. & नर्सिंग कॉलेज दिंद्रुड ता. माजलगाव जि. बीड, यश बी.एस्सी.बायोइन्फोरमॅटिक्स कॉलेज, लातूर पडीले कॉम्पलॅक्स, लातूर जि. लातूर, रमन ज्यू. कॉलेज (कला, विज्ञान, वाणिज्य) पूस ता. अंबाजोगाई जि. बीड,यश प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संगम ता. धारुर जि. बीड,स्मारक माध्यमिक विद्यालय, श्रीरामपूर जि. अहमदनगर, संस्था उभारल्या आहेत.ज्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुखकर झाले आहे.

    सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कोणत्याही परिस्थितीत त्याचा बाऊ न करता संयम व  धैर्याने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास हा त्यांच्या स्वभावाचा निराळा पैलू होता. ग्रामीण भागात जन्म झाला असल्याने त्या भागातील समाजाच्या शैक्षणिक व मूलभूत गरजांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना होता. त्यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली व आजही इतरांच्या सुख-दुःखात, संकट समयी मदतीचा हात पुढे करून सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी जीवनभर जोपासले. आई- वडिलांनी रुजवलेल्या संस्कारामुळे व आदर्श कौटुंबिक विचारांचा वारसा लाभल्याने कोणत्याही परिस्थितीवर हार न मानता सर्वांना बरोबर घेऊन तितक्याच निष्ठेने हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव, प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रतेने संवाद साधून, सर्वांशी विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क त्यांनी त्यांच्या हयातीत निर्माण केला. 

  शिक्षण क्षेत्रात कार्यकरत असताना प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाबरोबरच सुसंस्कृत व आव्हान पेलण्यास सक्षम जबाबदार घडलाच पाहिजे असे त्यांना वाटायचे.त्यांच्या अंगी स्वावलंबन रुजवून कौशल्य निर्माण करावीत यासाठी विविध शैक्षणिक व नाविन्य उपक्रमासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी आयुष्यभर केली. विद्यार्थ्यांची आरोग्य, गुणवत्ता विकास ,क्रीडा कौशल्य यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या या उत्कृष्ट स्वभाव वैशिष्ट्ययामुळे त्यांचे विविध सामाजिक, राजकीय औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात दिग्गज, व्यक्ती अधिकारी यांच्याशी आपुलकीचे मैत्रीपूर्ण संबंध होते.

   समाजाबरोबर ज्ञानसेवेचा अखंड ध्यास घेऊन जगणारा हे व्यक्तिमत्व समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी स्वतःचे आरोग्य व दुःख बाजूला ठेवून अहोरात्र झिजले. नेहमीच  ज्ञान मुक्त शिक्षणाला प्राधान्य देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे अभूतपूर्व  कार्य त्यांनी केले आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून परळी परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा.आज हाच वारसा जपत त्यांची मुले समाजसेवा करतायत.परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू  प्रदिप शिवाजीराव खाडे (अध्यक्ष, कै.रामभाऊ आण्णा खाडे सेवाभावी संस्था, लातूर, अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कुमठा, तथा सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ), विलास शिवाजीराव खाडे, बालासाहेब शिवाजीराव खाडे यांनी हा वसा पुढे चालू ठेवला आहे.

   जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै. शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.२ शके १९४५ शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी ह.भ.प.गणेश महाराज वारंगे (मादळमोहिकर) यांचे रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. शनिवार दि.२२ एप्रिल रोजी रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांचे १० ते १२ सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. कांदेवाडी येथील ग्रामस्थ, नातेवाईक,सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी तसेच  परिसरातील भाविक भक्तांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी कांदेवाडी ता.धारूर (दिंद्रड येथून दक्षिणेस ५ किमी अंतरावर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन खाडे परिवार यांनी केले आहे. कै. शिवाजीराव रामभाऊ खाडे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन....!

एम. पी. गित्ते

पत्रकार, परळी वैजनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या