💥पुर्णा तालुक्यातील चुडावा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी हक्कांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको......!


 💥शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान तात्काळ देण्याची मागणी💥


पूर्णा (दि.२१ एप्रिल) - तालुक्या तील चुडावा येथे आज शुक्रवार दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चुडावा राज्य महामार्गावर शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला आहे. पुर्णा तालुक्यातील चुडावा व कावलगाव मंडळातील चुडावा,न-हापूर, भाटेगाव, सोन्ना, पिंपळगाव,ध.टाकळी,पांढरी ,रूपला , हिवरा, वाई, धार, पांढरा, धोतरा, मरसुळ,देगाव, बरबडी आदी गावातील शेतकऱ्यांना दोन्ही मंडळातील शेतकऱ्यांना सप्टेंबर- आक्टोबर मध्ये झालेल्या  ओल्या दुष्काळाचे अनुदान  व 2022 मध्ये पावसाचा 25 दिवस खंड याचे देखील अनुदान सहा महिने उलटून देखील शासन शेतकऱ्यांना अनुदान देण्यास तयार नाही. 

आय सी आय सी आय लौंबार्ड पिक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा शासन व विमा कंपनी कडून अतिशय तुटपुंजी मदत करून महाराष्ट्र शासन व विमा कंपनी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यास व दुष्काळाचे अनुदान देण्यास टाळाटाळ करत आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना सप्टेंबर-आक्टोबर 2022 मध्ये झालेल्या दुष्काळाचे अनुदान देण्यात यावे, हक्काचा पिक विमा, चालू बाकी दार 50हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, 60वर्षा पुढील शेतकऱ्यांना महिन्याला 10हजार रु पेंशन चालू करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिक विमा व दुष्काळाचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे ह्या मागणी साठी चुडावा येथे राज्य महामार्गावर रास्तारोको करण्यात आला या वेळी उपस्थित  आंदोलनकर यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन    देण्यात आले कावलगाव व चुडावा मंडळातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष. ज्ञानेश्वर (प्रेम) देसाई,संतोष क-हाळे,प्रभाकर देसाई, विश्वनाथ बनसोडे,रोहिदास देसाई देवराव देसाई शहाजी देसाई लक्ष्मण देसाई भगवान देसाई व्यंकटराव हातागळे अशोक देसाई लक्ष्मण खल्लाळ गुणाजी गच्चे ज्ञानोबा देसाई सचिन देसाई भाऊराव देसाई प्रल्हाद देसाई सुभाषराव इंगोले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत दोन्ही मंडळातील  असंख्य शेतकरी या रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या