🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच निवडणुकीच्या प्रचाराचा गाजतोय फड...!


🌟शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना कपबशी निशाणीवर फुलीचा ठसा मारून प्रचंड बहुमताने विजयी करा असेही ते म्हणाले🌟पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभा घेऊन गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मतदाराशी संवाद साधला शेतकरी हिताची भूमिका घेऊन बळीराजाला साथ देण्यासाठी  मैदानात उतरलेल्या रासप,भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व मित्रमंडळ प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना "कपबशी"  या निशाणीवर फुलीचा ठसा मारून प्रचंड बहुमताने विजयी करा, असेही आवाहन आमदार गुट्टे यांनी केले.


     याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, ज्येष्ठ नेते विजयराव वरपूडकर, माजी सभापती वासुदेवराव नवघरे, मित्रमंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा युवा वक्ते संदीप माटेगावकर, पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश कदम, प्रभारी सुभाषराव देसाई, नंदकुमार डाखोरे, यांच्यासह पूर्णा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य, व्यापारी, हमाल व राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप,शिवसेना(शिंदे गट) व मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या