🌟पुर्णेतील जेष्ठ विधीज्ञ ॲड.जि.एन.डाखोरे यांना जिवे मारण्याची धमकी...!


🌟कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील दडपशाहीचे पडसाद🌟


🌟कागदपत्रे आणण्यास तहसिल मध्ये गेले असता दिली जिवे मारण्याची धमकी🌟 

 पुर्णा (दि.१० एप्रिल) - पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे वातावरण जोरदार तापू लागले असून कागदपत्रे आणण्यासाठी तहसील कार्यलयात गेलेले जेष्ठ विधीज्ञ ॲड.जि.एन.डाखोरे पाटील यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी धमकी देणाऱ्यास त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पुर्णा तालुका वकील संघाकडून करण्यात आली आहे.


या घटने संदर्भात सविस्तर माहिती अशी की दि.०६ एप्रिल २०२३ रोजी अंदाजे सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या निवडणुकी संदर्भातील अक्षेपा बाबत निर्णयाच्या प्रती पाहण्यासाठी जेष्ठ विधीज्ञ ॲड.जि.एन.डाखोरे पाटील हे पुर्णा तहसिल कार्यालयात जावून पटलावर दर्शविलेल्या निर्णयाची पहाणी करत असतांना अतुल गंगाधर पवार राहणार चुडावा यांनी ॲड. डाखोरे यांना अर्वाच्च भाषेत तुझी पाहुन घेतो, तुझे फार जास्त झाले तुला दाखविल्या शिवाय राहणार नाही, तु फार जास्त तहसिल कार्यालयात निवडणुक अधिकाऱ्यां समोर बोललास आता तुला पाहुन घेतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी देवुन पवार निघुन गेला व तुला खतम करतो असे म्हणाला सदर घटना ही तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात झाली असे प्रकार वारंवार वकील संघातील सदस्यावर पक्षकारांनी वकीलांची बेइज्जती करणे हे असंवैधानीक व अशोभणीय कृत्य आहे. वकीलांचे कर्तव्य आपल्या आशिलाची बाजु मांडणे, पक्षकारांची बांजु चांगल्या प्रकारे मांडली म्हणुन वकीलास बेइज्जती करून शिवीगाळ करण्याचा घटनेत वाढ होत त्यामुळे अशा कृत्य करणाऱ्या दोषी वर कडक कारवाई  करून जेष्ठ वकील डाखोरे यांना धमकी देणारे अतुल पवार यांच्या विरोधात कडक कारवाई करण्या संदर्भात पुर्णा पोलिस स्टेशन यांना आदेशीत करावे व सर्व वकील बांधव यांना संरक्षण देण्यात यावे. वकील बांधावांच्या जिवीत्वास धोका निर्माण होवु नये याची दखल घेण्याची मागणी वकील संघाने तहसीलदार पूर्णा याना देण्यात आलेल्या निवेदना द्वारे केली आहे या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.डि.आर.काळे सह आदी पदाधिकाऱ्याचे स्वाक्षरी आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या