🌟परभणी जिल्ह्यात पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह ‌पावसाची शक्यता....!


🌟हवामान विभागाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना🌟 

परभणी (दि. २७ एप्रिल) :  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबईने दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार दिनांक २८ ते ३० एप्रिल २०२३ या काळात परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे  नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे. 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ते त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवाव्यात. 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली स्नान करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याच्या पाईपलाइनला स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका, विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नको. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही हवामान विभागाने कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या