🌟जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनी मधील सय्यद गौस यांची आठ वर्षीय मुलगी सय्यद खतीजा हिचा पहिला रोजा...!🌟रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारन महत्व🌟 

जिंतूर  प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.03 एप्रिल) - शहरातील मौलाना आझाद कॉलनी मधील राहणार सय्यद गौस यांच्या आठ वर्षीय मुलगी सय्यद खतीजा हिने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधुन दि.2 एप्रिल रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे. 

रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारन महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून रात्री तरावीह ची विशेष नमाज अदा करतात आणि याच महिन्यात लहान बालके  आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून आठ वर्षीय सय्यद खतीजा हिने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणुन सय्यद खतीजा यांचे वडिल सय्यद गौस, भाऊ सय्यद रेहान, सय्यद फैजान, सय्यद रोमान, अजमत पठाण, मोहसीन खान पठाण, बाबाखान पठाण आदींनी तिचे कौतुक केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या