🌟श्री केदारनाथ शिवालय मंदिर येथे कै.शिवाजी खाडे यांच्या स्मरणार्थ प्रदीप खाडे यांच्याकडून शेड अर्पण....!


🌟यावेळी खाडे कुटुंबियाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते🌟

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- शहरातील बायपास रोडभागातील श्री केदारनाथ शिवालय मंदिर येथे कै. शिवाजी रामभाऊ आण्णा खाडे यांच्या स्मरणार्थ प्रदीप शिवाजीराव खाडे यांच्याकडून शेड अर्पण करण्यात आला. खाडे कुटुंबियाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.      

            श्री केदारनाथ मंदिर परिसरातील शेड बांधकामाला सुरूवात करून काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या भाविकांसाठी सदर शेड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कै. रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्था लातूरचे अध्यक्ष व नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी कै. शिवाजी रामभाऊ खाडे यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत व सामाजिक बांधिलकी जपत मंदिर परिसरात भाविकांसाठी शेड अर्पण केले आहे. प्रदीप खाडे यांनी स्वखर्चाने शेडचे काम पूर्ण केले आहे. 

        मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याशिवाय साक्षगंध, वाढदिवस व इतर छोटे-मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात.  शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध कार्यक्रमानिमित्त करण्यात येणाऱ्या बैठकीची व्यवस्था व स्वयंपाकाची अडचण मार्गी लागली आहे. श्री केदारनाथ शिवालय मंदिर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान बनले आहे.

       सोमवार दि. 3 एप्रिल रोजी खाडे कुटंबियाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी जि. प. अध्यक्ष शिवाजी सिरसाट, बबन लोमटे, भरडिया शेठ,मनोज गित्ते,रंजित चाचा लोमटे, खंडू गोरे,  अजित गरड,  ताराचंद शिंदे, दीपक कोटे, आप्पा भोंसले सर,  तोड़कर सर,  मगर सर, कोमटवर सर,  संजय गंभीरे सर, शिटोले साहेब, कातले सर सुरेश नाना फड़,  अंकुश फड़ सर,  जोगदंड सर, पो. नी.हनुमंत मुंडे, प्राचार्य अतुल दुबे, दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे, प्रा. शंकर कापसे, प्रा. किरण शिंदे, पत्रकार महादेव गित्ते, दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे अंबाजोगाईचे प्रतिनिधी सुभाष मस्के व इतर नागरिक, भविक भक्त उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या