🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे वीज पडून ३० वर्षीय शेतकरी युवक जागीच ठार...!


 🌟तर या घटनेत सोबत असलेला अन्य एक जन गंभीर जखमी🌟

पुर्णा (दि.२६ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय शेतकऱ्याचा विज पडून भाजल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दि.२६ एप्रिल रोजी दुपारी ०४-३० वाजण्याच्या सुमारास धनगर टाकळी शेत शिवारात घडली.तर त्याच्या सोबत असणारा अन्य एक जण गंभीर भाजला आहे.

धनगर टाकळी शिवारात सारंगी रस्त्यावर असणाऱ्या शेतात येथील विठ्ठल पुरबाजी कोकरे व दत्ता  हे शेतात होते. दुपारी ०४-०० वाजण्याच्या सुमारास अचानक वारे व विजेचा कडकडत असताना एक वीज त्यांच्या दिशेने आली.या घटनेत विठ्ठल कोकरे हा गंभीर भाजल्याने जागीच मृत्यू पावला.तर त्याचा सोबती दत्ता हा सुद्धा  भाजला त्यास पूर्णा येथे दवाखान्यात हलवले आहे.
     वीज पडून गावातील इसमाचा मृत्यू झाल्याने धनगर टाकळी गावावर शोक कळा पसरली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या