💥पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ वाटप.....!


💥मराठी विभागाच्या वतीने डॉ.शिवसांब कापसे लिखित ग्रंथ वाटप करून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन💥

पूर्णा (दि.१२ एप्रिल) - येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात बी.ए.तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभागाच्या वतीने डॉ. शिवसांब कापसे लिखित ग्रंथ वाटप करून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले यांनी 'विद्द्ये विना मती गेली' हे सूत्र समोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक कार्य करून समग्र मानव जातीच्या उत्थानासाठी जीवन भर प्रयत्न केले.

या सर्वांपाठीमागे ज्ञानदान करणे, वृद्धिंगत करणे तसेच अज्ञानापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, हाच विचार घेऊन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ग्रंथाचे वाचन करून महात्मा फुले यांच्या विचारावर चालले पाहिजे हा हेतू ठेवून प्रसंगी हे ग्रंथ वाटप करण्यात आले,यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ. के. राजकुमार उपप्राचार्य शेख फातिमा ,डॉ पांडुरंग भुताळे ,डॉ  विजय पवार, डॉ सोमनाथ गुंजकर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या