🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* देवेंद्र फडणवीस फडतूस गृहमंत्री, मुख्यमंत्री नव्हे हे तर गुंडमंत्री; ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला कार्यकर्तीस मारहाण प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात ; फडतुस कोण हे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना जनतेने पाहिले देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार ; आमचे तोंड उघडले तर तुमची पळता भुई होइल ---- देवेंद्र फडणवीस 

* संभाजीनगरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचा पेपर तीनशे रुपयात,शिक्षण क्षेत्रात खळबळ; विद्यापीठाचे कारवाईचे आश्वासन 

* सोशल मीडियावरील पोस्टवरून ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला कार्यकर्तीस शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण ; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी ठाण्यामध्ये येऊन रोशनी शिंदे यांची  घेतली भेट  , उद्धव ठाकरे गटाचा उद्या 6 एप्रिल रोजी ठाण्यात मोर्चा 

* सिक्कीमच्या त्सोमगो तलावाजवळ झालेल्या हिमस्खलनात 6 जणांचा मृत्यू, 150 पर्यटक अडकल्याची धक्कादायक माहीती

* IPL वर कोरोनाचे सावट कमेंटेटर आकाश चोप्रा कोरोना पॉझिटीव्ह, आकाश चोप्राने स्वतः ट्विट करत दिली माहीती 

* ऑस्ट्रेलियामध्ये टिक-टॉकवर बंदी येणार, सरकारी मोबाईलवर टिक-टॉकचा वापर करण्यास येथील सरकारने सुरक्षेचे कारण देत लागू केले निर्बंध 

* भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

* न्यायदानाच्या प्रक्रियेत कर्नाटकची बाजी, महाराष्ट्र 11व्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश सर्वात शेवटच्या क्रमांकावर; इंडिया जस्टिसचा अहवाल

* ईडीने 33 हजार 862 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती केली जप्त, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली माहीती

* राज्यात ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती वाढल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीही धान्याच्या किंमतीत किलोमागे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ

* मुंबई विमानतळावरून सर्वाधिक सोन्याची तस्करी, कस्टम विभागाच्या आकडेवारीत एप्रिल-2022 ते फेब्रुवारी-2023 मध्ये 360 कोटींचे 604 किलो सोने जप्त 

* सिक्कीममध्ये हिमस्खलन; 6 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, 150 लोक बर्फात अडकल्याची भीती

* पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, नाशिकच्या चांदवड तालुक्यातली घटना

* पश्चिम रेल्वे मार्गावर 5 एप्रिल पासून धावणार अतिरिक्त 11 नॉन एसी लोकल्स

* प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला करोना पॉझिटिव्ह, ट्विटकरुन दिली माहिती

* नवं शैक्षणिक वर्ष 12 जून पासून ; विदर्भात 26 जून पासून सुरू होणार शाळा

* किल्ला संवर्धनासाठी तरतूद:सिंहगड परिसर संवर्धनासाठी पावणेचार कोटी मंजूर, पुरातत्व विभागातर्फे एप्रिलअखेर कामाला सुरुवात

* राेजगार निर्मितीला चालना:प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 49 कोटींचे प्रस्ताव मंजूर, 366 शेतकऱ्यांना लाभ

* अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ ; अ‍ॅट्रासिटी अंतर्गत तक्रार दाखल

* आयकर विभागाकडून देशातील जनतेवर ४४ हजार कोटीची दरोडा - राजू शेट्टी

* शहीद जवान सुभेदार अजय ढगळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

* भारताचा विकासदर कमीच राहणार: जागतिक बँकेचा भारताच्या जीडीपी वाढीच्या अहवालात अंदाज, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताचा जीडीपी 6.6 वरून 6.3 टक्क्यांवर खाली येण्याचा अंदाज

* धक्कादायक! सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर, 6 जणांचा मृत्यू; 150हून अधिक जण अडकल्याची भीती

* ऑस्ट्रेलियातही टिक-टॉक बॅन? सरकारी मोबाईलवर टिक-टॉकचा वापर करण्यास येथील सरकारने सुरक्षेचे कारण देत लागू केले निर्बंध, चालू आठवड्यात होणार निर्णयाची अंमलबजावणी

* टाटा समूहाची व्यापार आणि वितरण शाखा असलेल्या टाटा इंटरनॅशनलला मिळाले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव सिंघल यांची COO म्हणून नियुक्ती

* न्यायदानाच्या प्रक्रियेत कर्नाटकची बाजी! महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश सर्वात शेवटच्या क्रमांकावर; इंडिया जस्टिसचा अहवाल

* सोन्याचे दर:  मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 55300 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 60330 रुपये

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या