🌟जिंतुरात कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेना (शिंदे) गट लढवणार...!


🌟शिवसेनेचा 'शिव आशिर्वाद पॅनल' निवडणूकीसाठी सज्ज🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर जिंतूर तालुक्यातील बोरी व जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून त्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) पुर्ण ताकतीनिशी निवडणूक लढवणार असून त्यामध्ये सर्व ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे आज एक एप्रिल रोजी जिंतूर येथील शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख अँड.सुनील बुधवंत तर महिला तालुका अध्यक्ष सौ. अक्षदा राजेश चक्कर पाटील, संघटक अंकुश राठोड , शहराध्यक्ष गजानन गीते व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत पक्षांच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर व बोरी येथील निवडणूक शिव- आशीर्वाद पॅनल अंतर्गत लढण्याचा निर्णय करण्यात आला व सर्व ठिकाणी उमेदवार लढणार असा निर्णय घेण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या