💥पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल.....!


 💥पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार माधवराव बोथीकर💥 

पुर्णा ( दि.२९ मार्च ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची प्रक्रिया सोमवार दि.२७ मार्च पासून तहसील कार्यालयात सुरू झाली होती या निवडणुकीसाठी उमेदवाराकडून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात येत होते तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सोमवार दि.०३ एप्रिल अशी होती. 

पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार माधवराव बोथीकर  तर ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू हे काम पाहत होते. तर या  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते तरी आज दि. ०३ एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी पूर्णा करीता १८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे तर ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १०३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या