🌟जिंतूर बसस्थानकावर प्रवासी वर्गासह नागरिकांसाठी पाणपोई केंद्राचे उद्घाटन....!


🌟स्व.आयोध्यादेवी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम🌟


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०७ एप्रिल) :- येथील बसस्थानकावर स्व. आयोध्यादेवी रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने  शुक्रवार ता.७ रोजी नागरिकांना पिण्यासाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले

         या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष   म्हणून आगार प्रमुख मनीष जवळेकर, उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीपभाईजी महाराज,  वाहतूक निरीक्षक भगवान चिभडे, वाटुरे साहेब, वाहतूक नियंत्रण संदीप भांबळे, रमेशजी दगड उपस्थित होते. यावेळी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ब्रीजगोपालजी तोष्णीवाल यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील तेरा वर्षांपासून तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बस स्थानकावरील सर्वसामान्य प्रवाशांना थंड पाणी मिळावे यासाठी पाणपोईचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती देवून महामंडळाच्या वतीने दरवर्षी पाणपोई साठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक व गोरगरीब लोकांना  ता.१७ एप्रिल रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची व  ता.२९ एप्रिल रोजी दिव्यांग शल्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  दिली. यावेळी संदीपभाईजी महाराज यांनी तोष्णीवाल परिवाराच्यावतीने करण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमातून समाजसेवा  होत असल्याने चारिटेबल ट्रस्टचे कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी तोष्णीवाल परिवाराच्या वतीने आयोजित केल्या जात असलेल्या  उपक्रमाचे कौतुक केले. तसेच रमेश दगड यांनी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या  वतीने आयोजित केल्या जात असलेल्या उपक्रमासाठी सर्वांनी दररोज एक तास  वेळ देऊन सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा अशा आवाहन केले. 

         कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन रमणजी तोष्णीवाल यांनी केले.तर सूत्रसंचालन विनोद पाचपीले यांनी केले. या कार्यक्रमावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ,पत्रकार, वकील व कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या