🌟परभणी जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांचे थकीत पीएफ तात्काळ जमा करा....!


🌟भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीद्वारे जोरदार मागणी🌟

परभणी (दि.१९ एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व उप जिल्हा रुग्णालयांतर्गत अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या १०२ रुग्णवाहिकांवरील चालकांचे संबंधित एजन्सीद्वारे पीएफ तात्काळ जमा करुन घ्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीने आज बुधवार दि.१९ एप्रिल रोजी केली आहे.

            कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता गेल्या ९ महिन्यांपासून या चालकांना संबंधित एजन्सीधारकाने कामावरून काढून टाकले श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस या खाजगी कंत्राट कंपनीने हे कृत्य करतेवेळी या कर्मचार्‍यांच्या पीएफच्या रक्कमा सुध्दा खात्यांमध्ये जमा केल्या नाहीत. आज ना उद्या पीएफची रक्कम जमा होईल, म्हणून हे कर्मचारी प्रतिक्षा करीत होते. दुर्देवाने ९ महिन्या पासूनचे पीएफ अद्यापपर्यंत वाहन चालकांच्या खात्यात जमा झाले नाही, अशी खंत भाजपच्या या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

           जिल्हा शल्य चिकित्सक व श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस या खाजगी कंत्राट कंपनीमधे कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याने आज रुग्णवाहिका ठप्प आहेत. त्यावरील चालकही रोजगाराविना अक्षरशः हैराण आहेत. पूर्वसूचना न देता कामावरून कुठलेही कारण नसताना कमी करण्याचे प्रकारही सुरु झाले आहेत, असे स्पष्ट करीत या शिष्टमंडळाने याचे उत्तर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिले पाहिजे. आणि जिल्हा शल्य चिकित्सक व श्री स्वामी समर्थ सर्विसेस यांच्यावर कामगारांना वेठीस धरल्या प्रकरणी दंडात्मक कार्यवाही झाली पाहिजे, अश्या आशयाची मागणी केली.

            यावेळी भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुप्रिया कुलकर्णी, विजया कातगडे, शकुंतला मठपती, छाया मोगले, रमा शेजावळे, रुग्णवाहिका वाहन चालक भानुदास वाघमारे, कैलास ढेंबरे, लक्ष्मण खटिंग, धनाजी घोरपडे, दत्ता इंगळे, शेख अतिख, सुदाम राठोड, भागवत मोगल आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या