🌟परप्रांतीय रेल्वे स्टेशन मास्टरने महाराष्ट्रीयन वरिष्ठ सहाय्यक चालकावर केला जिवघेणा हल्ला...!🌟असिस्टन ड्रायव्हर गंभीर जखमी,स्टेशन मास्टर कालुराम मिनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी🌟


[हल्लेखोर परप्रातीय स्टेशन मास्तर कालुराम मिना याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत वरिष्ट सहाय्यक चालकांनी डिआरएम कार्यालयात एकत्रित येवून निषेध करीत केले आंदोलन

नांदेड/परभणी (दि.२५ एप्रिस) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा रेल्वे जंक्शन येथील क्र्यू-बुकींग लॉबी येथे कार्यरत असलेल्या ऑन ड्युटी चालक अरविंद कुमार व वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे हे मुदखेड तालुक्यातल्या सिवणगाव येथे मालगाडी घेऊन गेले असता गाडी सोडून वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे हे येथील स्टेशन मास्तरला मेमो देण्यास गेले यावेळी स्टेशन मास्टर कालुराम मिना यांनी सदर वरिष्ठ सहाय्यक चालक नाईकवारे यांना तु अंदर कैसे आया असे म्हणून अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली यावेळी नाईकवारे यांनी नियमाप्रमाणे मी आपणास मेमोसदेण्यास आलो असल्याचे म्हणाले परंतु स्टेशन मास्तर शिविगाळ करीत असल्याने दोघात बोलाचाली झाली यावेळी स्टेशन मास्तर मिना यांनी एडीआरएम माझा नातेवाईक मिनाच असल्याने मी तुला नौकरीवरून काढून टाकील असेल म्हणाले यावेळी त्यांनी नियमाप्रमाणे रजिष्टर नाईकवारे यांना दिले त्यांनी रितसर नोंदही केली यानंतर मात्र संबंधित स्टेशन मास्तर मिना यांने नाईकवाडे यांच्या गालावर दोन चापटी मारल्या सदरील घटना नाईकवारे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर टाकलि असता त्यांनी स्टेशन मास्तर मिना याचीच बाजू घेत नाईकवारे यांना माफी मागण्यास सांगितले वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान राखत त्यांनी माफी देखील मागितली परंतू मग्रुर स्टेशन मास्तर कालुराम मिना यांनी त्यांना पाया पडून माफी माग असे म्हटल्यावर त्यांनी नकार देत स्टेशन मास्तर मिना यांच्या कार्यालयातून बाहेर जाण्याच्या प्रयत्न करीत असतांना मिनाने याने नाईकवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात वरिष्ठ सहाय्यक चालक नाईकवारे यांचे डोके फुटले यावेळी रक्ताची धारच लागल्यामुळे स्टेशन मास्तर मिना यांच्या कार्यालयात सर्वत्र रक्त सांडले व नाईकवारे यांचे कपडे देखील रक्ताने भरले सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ट सहाय्यक चालक अमोल नाईकवारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यां सह नांदेड रेल्वे पोलिसांत ही तक्रार दाखल करून स्टेशन मास्टर कालुराम मिनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


या बाबत अधिक वृत्त असे की दि.२४ एप्रिल २०२३ रोजी पूर्णा रेल्वे स्थानकावरुन सायंकाळी मालगाडी घेऊन पुर्णा जंक्शन रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीत कार्यरत असलेले चालक अरविंदकुमार व वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे हे मालगाडी घेऊन गेले होते आज दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सदर मालगाडी मुदखेड जवळून दहा पंधरा किलो मीटर अंतरावर असलेल्या सिवनगाव रेल्वे स्थानकार ते पोहोचले तेव्हा आपली ड्युटी पुर्ण झाली म्हणून लोको पायलट अरविंद कुमार यांनी वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे यांना सिवनगाव रेल्वे स्थानकावरील  स्टेशन मास्टर  कलुराम मीना यांच्या कडे मेमो घेऊन पाठविले तेव्हा स्टेशन मास्टर मीना यांनी मेमो घेण्यास नकार दिला यावेळी त्यांनी अमोल नाईकवारे यांच्याशी हुज्जत बाजी करून दोन चापटी मारल्या आणि त्यानंतर ते वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे माफी मागून परत आपल्या लोको वर येत असताना मागून त्यांच्या वर स्टेशन मास्तर कालुराम मिनाने जीवघेणा हल्ला केला यात वरिष्ट सहाय्यक चालक अमोल नाईकवारे यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने ते रक्तभबाळ झाले त्यांना तेथिल उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले  दरम्यान या घटने मुळे रेल्वे विभागात खळबळ माजली आहे आणि या घटनेची तक्रार जखमी अमोल नाईकवारे यांनी आपल्या रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्या कडे करून स्टेशन मास्टर मीना याच्या विरोधात नांदेड रेल्वे पोलिसांत ही तक्रार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून पूर्णा येथील लॉबीत ही वरिष्ठ सहाय्यक चालकांकडून या घटनेचा निषेध करून त्वरित दोषी स्टेशन मास्टर मीना यांच्या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या