🌟नांदेड येथे गेल्या काही दिवसापासून तृतीयपंथी यांच्यात भिक्षा मागण्यावरून वाद : तृतीय पंथीयांचे गुरु विषयी तक्रार दाखल...!


🌟तृतीय पंथीयांच्या गुरुवर केलेले आरोप बिनगुडाचे - गौरी बकश 

नांदेड (दि.०४ एप्रिल) - नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तृतीयपंथीयां मध्ये भिक्षा मागण्यावरून कमी अधिक प्रमाणात वाद होत आहेत या अंतर्गत वादातूनच काही तृतीयपंथीयांनी नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्थानकात तृतीय पंथीयांचे गुरु यांच्या विषयी तक्रार दाखल केली आहे.

 या तक्रारीत तक्रारदार तृतीय पंथीयांनी असे नमूद केले आहे की गुरु यांच्याकडून आम्हाला नांदेड शहर सोडून जा नसता दहा हजार रुपये हप्ता द्या असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी गुरु व त्यांच्या शिष्यांनी मिळून तक्रारीत केलेल्या या आरोपाचे खंडन केले आहे केलेल्या आरोपावर पुरावे द्यावेत अन्यथा तात्काळ माफी मागावी असे नांदेड जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी गुरूकडून सांगण्यात आले आहे अन्यथा कायदेशीर कारवाईस समोर जावे असे नमूद करण्यात आले आहे यावेळी प्रमुख उपस्थिती शहाणुर बकस यांच्यासह जया बकस,अर्चना बकस,फरीदा बकस, बिजली बकस या गुरुसह नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची प्रामुख्याने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या