🌟महाराष्ट्रीयन मराठी कर्मचाऱ्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोर परप्रातीय स्टेशन मास्तरावर अखेर गुन्हा दाखल...!


🌟नांदेड रेल्वे पोलिस स्थानकात आरोपी स्टेशन मास्तर कालुराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे🌟


नांदेड/परभणी (दि.२८ एप्रिल) - दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात परप्रातीय अधिकाऱ्यांकडून स्थानिक महाराष्ट्रीयन मराठी अधिकारी/कर्मचाऱ्यांना अत्यंत तुच्छतेची वागणूक देण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून परप्रांतीय अधिकारी/कर्मचारी प्रांतवाद भाषावादाला प्रोत्साहन देऊन जाणीवपूर्वक स्थानिक मराठी कामगारांचे मानसिक सोशन/शारीरिक करीत सोशन करीत असल्याचे नुकतेच उघड झाले असून याच द्वेषभावनेतुन दि.२४ एप्रिल २०२३ रोजी पुर्णा जंक्शन रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीत कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे हे मालगाडी घेऊन गेले होते आज दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सदर मालगाडी मुदखेड जवळून दहा पंधरा किलो मीटर अंतरावर असलेल्या सिवनगाव रेल्वे स्थानकार ते पोहोचले तेव्हा आपली ड्युटी पुर्ण झाली म्हणून लोको पायलट अरविंद कुमार यांनी वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे यांना सिवनगाव रेल्वे स्थानकावरील  स्टेशन मास्टर  कलुराम मीना यांच्या कडे मेमो oघेऊन पाठविले असता येथील आडमूठ स्टेशन मास्टर मीना यांनी मेमो घेण्यास नकार दिला यावेळी त्यांनी अमोल नाईकवारे यांच्याशी हुज्जत बाजी करून दोन चापटी मारल्या आणि त्यानंतर ते वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे माफी मागून परत आपल्या लोको वर येत असताना मागून त्यांच्या वर स्टेशन मास्तर कालुराम मिना या आडमुठ परप्रांतीय मिनाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात वरिष्ट सहाय्यक चालक अमोल नाईकवारे यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने ते रक्तभबाळ झाले होते यानंतर सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्नालयात दाखल केले होते.


या घटने संदर्भात वरिष्ठ सहाय्यक चालक अमोल नाईकवारे यांनी दि.२६ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या फिर्यादी वरुन नांदेड रेल्वे पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी कालुराम मिना याच्या विरोधात गुरनं.०३८५/२०२३ चे कलम ३२४,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटने संदर्भात संबंधित आरोपी स्टेशन मास्तर मिना याच्या विरोधात नियमानुसार कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला हवा होता परंतु संबंधित परप्रांतीय अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक वाचवण्याचा गंभीर प्रकार होत असून त्याचा बचावासाठी सर्वच परप्रांतीय अधिकारी/कर्मचारी सरसावल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात प्रांतवाद/भाषावादाला खतपाणी घालण्याचा गंभीर प्रकार होत असल्यामुळे याचे दुष्परिणाम हळुवारपणे समोर येत असल्याचे दिसत आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या