🌟विमुक्त जाती भटक्या जमातीमधील धनगर प्रवर्गातील लोकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟धनगर समाजाच्या व्यक्तींसाठी राज्यात ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे🌟

परभणी (दि.25 एप्रिल) : गेली अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीमधील धनगर प्रवर्गातील लोकांचा सर्वागींन विकास व्हावा व त्यांना स्थिरता निर्माण व्हावी यासाठी धनगर समाजाच्या व्यक्तींसाठी राज्यात ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. सदर घरकुल योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक धनगर बांधवसाठी लागू करण्यात आलेली आहे ग्रामिण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या घरकुलासाठी संबंधित गावाचे ग्रामसेवक यांचेकडुन प्रस्ताव संबधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास सादर करण्यात यावेत. तदनंतर संबंधित गट विकास अधिकारी योनी परिपूर्ण पात्र प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांचेकडे सादर करावे.

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी खालील प्रमाणे अटी / शर्ती लागू आहेत. लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा. लाभार्थी कुटूंबातील वार्षीक उत्पन्न रु 1 लाख पेक्षा कमी असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थीच्या नावे 7/12 किंवा 8-अ नमुना असावा. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यत कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटूंबातीत एकाच पात्र व्यक्तीस लाभ देण्यात येईल, पात्र लाभार्थी कुटूंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नौकरीस सेवेमध्ये नसावा, या योजनेतील भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंब हे भटकंती करणारे / पालात राहणारे / दारिद्रय रेषेखालील कुटूंब /घरात कोणीही कमावत नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला व पूरग्रसत क्षेत्रातील कुटूंब यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी यांना प्राप्त होणारे घरकुल हे भाडे तत्वावर अन्य व्यक्ती/कुटूंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही. व ते घर विकता येणार नाही तसे आढळून आल्यास घरकुलाचा लाभ रद्द करण्यात येवून मंजूर निधीची वसूली करण्यात येईल. घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायत कडुन अकारण्यात येणारी वार्षीक घरपट्टी व पाणीपट्टी लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहिल. व घराची देखभाल दुरूस्ती लाभार्थ्यांना स्वतः करावी लागेल.

धनगर बांधवाच्या घरकुल अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कार्यन्वयन समिती असुन त्या समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी (महसूल) हे असुन, जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, परभणी हे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्राप्त होणारे पात्र प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात येवून निधी मागणीसाठी शासनास सदर प्रस्तावाची यादी सादर करण्यात येते त्यानुसार परभणी जिल्ह्यातील सर्व भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर बांधवांना कळविण्यात येते की, संबधित पंचायत समितीमार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण परभणी यांचेकडे घरकुल योजनेसाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्यात यावेत असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या