🌟पुर्णा तालुक्यातील मौ.खांबेगाव येथील सरपंचाचा असाही प्रताप : राजकीय द्वेषापोटी अपंग ग्रामरोजगाराचा छळ...!


🌟सरपंचाकडून अल्पसंख्यांक अपंग ग्रामरोजगार सेवकास ठराव घेऊन कामावरून काढण्याचीही दिली धमकी🌟 

🌟सरपंचाच्या छळाला कंटाळून ग्रामरोजगार सेवक शेख जानिमियाँ अलावद्दीन बसले पंचायत समिती समोर उपोषणाला🌟


पुर्णा (दि.०५ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील मौ.खांबेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच राजकीय द्वेषापोटी एका अल्पसंख्यांक अपंग ग्रामरोजगाराचा जाणीवपूर्वक आर्थिक मानसिक छळ करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून संबंधित ग्रामरोजगार सेवक शेख जानिमियाँ अलावद्दीन यांनी आज बुधवार दि.०५ एप्रिल रोजी संबंधित सरपंचा विरोधात पंचायत समिती कार्यालया समोर उपोषणाला सुरुवात केली आहे.


यासंदर्भात ग्रामरोजगार सेवक शेख जानिमियाँ अलावद्दीन यांनी दि.३१ मार्च २०२३ रोजी पुर्णा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सरपंचांच्या रजाकारी कारभारा विरोधात उपोषण करण्या संदर्भात लेखी स्वरुपात अर्ज दिला होता या अर्जाची तत्कालीन गटविकास अधिकारी वानखेडे यांनी योग्य दखल घेतली नाही यानंतर नव्याने रुजू झालेले जयराम मोडके यांनी देखील उपोषण अर्जाची दखल न घेतल्यामुळे अपंग ग्रामरोजगार सेवक शेख जानिमियाँ अलावद्दीन राहणार खांबेगाव तालुका पुर्णा यांना आज बुधवार दि.०५ एप्रिल २०२३ रोजी नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला त्यांनी अर्जात असे नमूद केले आहे की मी आर्थिक वर्ष २०२२/२३ मध्ये जुन ते आक्टोंबर या कालावधीत केलेल्या कामाचे मानधन १३७००/-रुपयें एवढे असून या मानधनाचा धनादेश (चेक) मौ.खांबेगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी स्वाक्षरी करुन दिला होता तो धनादेश मी सरपंच यांच्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी दिला परंतु सरपंच हे राजकीय द्वेषापोटी मानधनाच्या धनादेशावर जाणीवपूर्वक स्वाक्षरी करीत नसून मी मानधनाचा धनादेश मागतोय म्हणून माझ्या विरोधात ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन मला कामावरून काढण्याची धमकी दिली जात असुन मला जाणीवपूर्वक माझ्या कामाचा मोबदला सरपंच यांच्याकडून दिला जात नसल्याचे अपंग ग्रामरोजगार सेवक शेख जानिमियाँ अलावद्दीन यांनी अर्जात नमूद केले असून रमजान ईदचा पवित्र महिना चालू असल्यामूळे ईदसाठी पैशाची नितांत गरच  असून सरपंचसायांना दहा वेळा मानधनाच्या चेकाची मागणी करुन देखील सरपंच चेकवर सही करुन देत नसल्यामुळे त्यांना शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला भर रमजान महिण्यात कडक उन्हाळ्याचे दिवस असतांना देखील एका अल्पसंख्यांक अपंग ग्रामरोजगार सेवकाला दृष्ट प्रवृत्तीच्या सरपंचाच्या आडमुठ धोरणा विरोधात आमरण करण्याची वेळ यावी प्रशासनासाठी यापेक्षा लाजीरवाणी बाब कोणती ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या