🌟परभणी तालुक्यातील मौ.धोंडी येथे सामुहिक बिजपुजन कार्यक्रम संपन्न....!


🌟या सामुहिक बिज पुजनाकरीता ८० प्रकारची पारंपारीक बियाने गावकरी मंडळींनी उपलब्ध करुन दिली🌟

परभणी (दि.२२ एप्रिल) - परभणी तालुक्यातील मौजे धोंडी येथे काल शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी सामुहिक बिजपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सामुहिक बिज पुजनाकरीता ८० प्रकारची पारंपारीक बियाने गावातील पुरुष व महिला कार्यकर्ते यांचेद्वारे उपलब्ध करण्यात आले होते.


सदरील बियाण्याची सामुहिकरीत्या ब्राह्मवृंदाकडून प्रथम विधीयुक्त मंत्रोच्चाराने पुजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा . ॲड. सुभाषराव सखाबापू देशमुख प्रांत उपाध्यक्ष , मा. जिल्हाध्यक्ष श्री नामदेवराव बुचाले, मा. सुंदरराव शिंदे उपाध्यक्ष, मा. विद्याताई धोंडरकर उपाध्यक्षा, जिल्हामंत्री मा. भगवान राव खटिंग, जिल्हा प्रसार प्रमुख श्री ज्ञानोबा कदम व गावातील २५ पुरुष व १३० महिला असे एकूण १५५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामुहिक बिजपुजन कार्यक्रम संपन्न करण्यात आला .  या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष प्रसारण रुप सागर डिजीटलस् चॅनल वर करण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते श्री रामचंद्र विठठलराव बुचाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा. जिल्हामंत्री भगवानराव खटिंग व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्रीनामदेवराव बुचाले यांनी केले व मा. प्रांत उपाध्यक्ष श्री ॲड. सुभाषराव देशमुख यांनी आपल्या समारोपीय भाषणाने उपस्थिताना पारंपारीक बियाण्याचे महत्व विषद करताना मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्या सौ . विद्याताई व सौ . सखुबाई सुर्यवंशी यांनी पारंपारीक बीज व शेतकरी अन्नदाता यांचेवर आधारीत स्वंयम रचीत गीत सादर केले व शेवटी सामुहिक पसायदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या