🌟परभणी जिल्ह्यात ‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिम राबविण्यात येणार.....!


🌟जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांची माहिती🌟

परभणी (दि.06 एप्रिल) : जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 ते 14 एप्रिल या कालावधीत ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता मोहीम संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये राबविणार येणार आहे.

          जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. सरकारी रुग्णालय आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला जातो. हा स्वच्छता दिवस नेहमीच राबवायचा असून स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

           आरोग्य संस्था व भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडार गृह, इत्यादींची स्वच्छता करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी करण्यात येणार आहे आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणार्या सेवांचे फलक लावण्यात येतील. रुग्ण कल्याण समिती, स्थानिक स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग घेऊन हा उपक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.सदरील मोहिमेमध्ये उत्कृष्टपणे काम करणार्‍या निवडक आरोग्य संस्थांना खालील प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहेत.

          त्यामध्ये  राज्यस्तरावर प्रथम येणारे जिल्हा सामान्य रुग्णालयास दोन लक्ष रुपये पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच  जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यामधून एक रुग्णालय (ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालय/स्त्री रुग्णालय/ट्रामा केअर सेंटर यापैकी एक आरोग्य संस्था)   यांना 50 हजार रुपये व तीन प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येकी 20 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर  तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यामधून एक उपकेंद्र 10 हजार रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समितीमार्फत या मोहिमेअंतर्गत सर्व आरोग्य संस्थांचे मूल्यांकन करण्यात येणार असून तसेच सर्व विजेत्यांना महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालय येथे पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गीते यांनी दिली..,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या