🌟पुर्णेतील स्व.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....!


🌟प्रा.डॉ.संतोष कुऱ्हेंच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन 🌟


पूर्णा (दि.१४ एप्रिल) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आधुनिक भारताच्या संविधानाचे निर्माते, सामाजिक क्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष कुऱ्हे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे   प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दत्ता पवार यांनी मांडले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत विभागाच्या प्रा. सुजाता घन यांनी केले तर आभार प्रा. अतुल शिंदे यांनी  मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या