🌟परभणीतील समाजहित अभियान प्रतिष्ठान "डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्काराने" सन्मानित....!


🌟पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान वर सर्वच स्तरातून अभिनंदननाचा वर्षाव🌟

परभणी (दि.२९ एप्रिल) - शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान ला प्रतिष्ठानने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,  रुग्णहितार्थ तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविल्या बद्दल एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेऊन दिनांक 29 एप्रिल रोजी शहरातील श्री मंगल कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2023 प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे व सर्व टीमला सिने अभिनेता अनिल मोरे,माजी खासदार ॲड. तुकाराम रेंगे पाटील,प्रा.डॉ.अशोक जोंधळे, सुरेश हिरवाळे, प्रा.डॉ.भास्कर गायकवाड,अनीताताई सरोदे,यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमजत खान यांनी केले होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2023 स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव रमेश घनघाव, महीला अध्यक्षा रमाताई घोंगडे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, संदीप वायवळ, अजय शिराळे, विकास जमधाडे, शंकर बनसोडे, प्रकाश अंभोरे, विनोद वाडेकर, सरिताताई अंभोरे, वंदनाताई खिल्लारे, रेखाताई कांबळे, प्रियंका कांबळे, अजय अंभोरे, रामसिंग अंभोरे, अभिजित सोनवणे, विक्की गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड आदी उपस्थिती होती. 

       पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान वर सर्वच स्तरातून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या