🌟जालना येथे दि.०४ में रोजी अहीर गवळी समाजाकडून सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन....!


🌟या सामुहीक विवाह सोहळ्यात ३९ वधू-वर अडकणार विवाह बंधणात🌟

 जालना (दि.१२ एप्रिल) - जालना शहरात दि.४ मे २०२३ रोजी अहीर गवळी समाजाच्या वतीने भव्य सामुहीक विवाह सोहळ्यासह वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या भव्य विवाह सोहळ्यात ३९ वधू-वर विवाह बंधणात अडकनार असून या भव्य सोहळ्यात विवाह बंधणात अडकणाऱ्या जोडप्यांना अहीर वर-वधु परिचय मंच महाराष्ट्र यांच्याकडून भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा सप्रेम भेट दिली जाणार आहे. 

या भव्य विवाह सोहळ्यास अहीर गवळी समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहीर वर-वधु परिचय मंच महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शामलाल यादव पूर्णा,अध्यक्ष गोपाल सोनुलाल भुरेवाल जालना,सदस्य श्यामलाल झब्बूलाल बरेटिया वाशीम,सदस्य फुलचंद बंकुवाले अकोट,सदस्य दिपक खरे छत्रपती संभाजीनगर,मोहनलाल नंदवशी संभाजीनगर,गणेश भगत नांदेड़, आशिष देशवाले चंद्रपुर,डॉ.कुमार काबलिये भैंसा,गजानन लखनावाले बुरहानपुर,पवन दंडेले चंद्रपुर यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या