🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या पांगरी शिवारात वीज कोसळून एका मेंढपाळाचा मृत्यू तर दोघे जखमी....!


🌟मेंढपाळाच्या 20 पेक्षा अधिक मेंढ्या ही मृत्युमुखी🌟     

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर         

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या पांगरी येथे काल बुधवार दि.२६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०५-३० वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली. वीज कोसळून एका मेंढपाळाचा मृत्यू तर दोन जखमी झाले.                

 पांगरी येथे अचानक वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या गारपिटीत 17 वर्षीय  मेंढीपालक गणेश जहाने याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले दोन तरुण गंभीर जखमी झाले. यात 19 वर्षीय बाळू लोणकर आणि 22 वर्षीय माधव मांदळे यांचा समावेश आहे.        शहरासह परिसरात बुधवारी  दुपारी 4 वाजल्यापासून ढगाळ वातावरण होते. अन त्यातच 4.30 वाजण्याच्या सुमारास अचानक सर्वत्र वादळी वारा सुटला होता. तालुक्यातील पांगरी येथे ठोकर गारांसह तुफान पाऊस व विजा पडायला सुरुवात झाली. यात पांगरी शिवारात 17 वर्षीय मेंढीपालक गणेश जहाने याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर सोबतचे बाळू लोणकर आणि माधव मांदळे हे गंभीर जखमी झाले. मयत व जखमी तरुणांना ग्रामस्थांनी जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पण वैद्यकिय अधिकाऱ्यांनी गणेश जहाने यास तपासून मृत घोषित केले. तर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेत काही मेंढ्या दगवल्याची चर्चा रुग्णालयात होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या