🌟सोनपेठ तालुका पत्रकार संघाचा कौतुकास्पद उपक्रम : पत्रकारांसह सर्वसामान्यांसाठी आयोजित केले नेत्र तपासणी शिबीर...!


🌟डोळ्याचा साक्षात आरोग्य देव म्हणून प्रसीद्ध असलेल्या डॉ.लहाने यांनी दिवसभर जवळपास 600 लोकांची तपासणी केली🌟 


मराठी पत्रकार परीषद संलग्नित सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे तालुक्यातील केवळ पत्रकारच नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी भव्य नेत्ररोग शिबिराचे आयोजन केले होते विशेष म्हणजे या शिबिरासाठी त्यांनी पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांना आमंत्रित केले होते.डोळ्याचा साक्षात आरोग्य देव म्हणून डॉ तात्याराव लहाने प्रसीद्ध आहेत दिवसभर जवळपास 600 लोकांची तपासणी डॉ लहाने यांनी केली वय वर्ष 5 ते 90 वयोगटातील नागरिक यावेळी उपस्थित होते. 


यावेळी डॉक्टरांनी अनेकांना नेत्ररोग विविध शस्त्रक्रिया साठी अनेकांना मुंबईत बोलावले आहे.आता पर्यंत पत्रकारसंघ पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असत पण सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे तालुक्यातील जनतेसाठी असे शिबीर आयोजित करून एक नवीन पायंडा पाडला आहे त्यासाठी तालुका अद्यक्ष शिवमल्हार वाघे,बाबासाहेब गर्जे, सुधीर बिंदू,कृष्णा पिंगळे यांच्यासह  संपूर्ण सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या टीम चे अभिनंदन करावे तेवढं कमीच आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या