🌟मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा....!


🌟ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.कैलास डाखोरे यांनी दिली🌟 

परभणी (दि.२४ एप्रिल) : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दि.२५ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या दरम्यान मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मंगळवार दि.२५ एप्रिल रोजी बीड,धाराशिव,लातूर, परभणी,हिंगोली, नांदेड,छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात, दि.२६ एप्रिल रोजी हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव व लातूर जिल्ह्यात,दि.२७ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, लातूर, धाराशिव,छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात,दि.२८ एप्रिल रोजी जालना,बीड,परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वार्‍याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक २५ एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्ह्यात तर दिनांक २६ एप्रिल रोजी हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व परभणी जिल्ह्यात तर दिनांक २७ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा शक्यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.कैलास डाखोरे यांनी दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या