🌟परळी नगरपालिकेने रमाई घरकुल योजनेचा हप्ता तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना द्यावा.....!🌟अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धि प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे🌟   


                      
परळी (दि.२९ एप्रिल) - परळी नगरपालिकेने रमाई घरकुल योजनेचा हप्ता तात्काळ देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धि प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे.                                          

याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी नगरपालिके त रमाई घरकुल योजनेचे अनुदान एक महिना अगोदरच प्राप्त झाले असून त्याचा आतापर्यंत एकही लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलेला नाही तरी परळी नगरपालिकेने लवकरात लवकर अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थींचा पहिला हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा तसेच यामागील ज्यांची घरकुले पूर्ण झालेत त्यांना दोन लाख 36 हजार रुपये देण्यात आलेले आहेत उर्वरित रक्कम ही तात्काळ देण्यात यावी . करण मराठवाड्यातील जालना परभणी  औरंगाबाद लातूर आदी आधी जिल्ह्यात रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दोन लाख 50 हजार म्हणजेच अडीच लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आलेले असून फक्त बीड जिल्ह्यातच दोन लाख छत्तीस हजार का त्यासाठी उर्वरित रक्कम तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.अशी ही मागणी बालासाहेब जगतकर यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद परळी जिल्हाधिकारी कार्यालय बीड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड व विभागीय आयुक्तसाहेब औरंगाबाद कार्यालय इत्यादींना लेखी निवेदन दिले असल्याची माहिती ही वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या