🌟पुर्णा शहरात सर्वत्र निकृष्ट विकासकामांच्या नावावर शासकीय विकासनिधी गिळण्याची जंगी घौडदौड ?


🌟पुर्वीच्याच सिमेंट रस्त्यांवर पुन्हा निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते : शासकीय विकासनिधी गिळण्याची प्रत्येकाला घाई दिसते🌟


पुर्णा (दि.०३ एप्रिल) - 'राजा उध्दार झाला अन् जनसामान्यांच्या हाती भोपळा दिला' असा एकंदर कारभार पुर्णा नगर परिषदेचा झाला असून शहराच्या विकासासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी दिल्यानंतर देखील शहरातील विविध प्रभागांमध्ये आवश्यक असलेल्या मानवी वसाहतींमध्ये दर्जेदार सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांच्या बांधकामांसह विविध विकासकाम करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी नगर अभियंता व ओव्हरसियर यांची असते परंतु आपल्या जवाबदारीचे भान विसरलेले पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे व अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून सक्तीच्या रजेवर पाठवलेले पुर्व नगर अभियंता मंगेश देशमुख व त्यांच्या जागेवर नियमबाह्य पध्दतीने नियुक्त केलेले संगणक अभियंता गायकवाड,सब ओव्हर सियर संजय दिपके यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या भ्रष्ट गुत्तेदारांना खुली सुट दिल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये निकृष्ट व बोगस कामांचा सपाटाच चालत असल्याचे निदर्शनास येत आहे.


शहरातील रेल्वे परिसरालगत असलेल्या प्रभाग क्रमांक ०७ मधील अनेक परिसरात विधान परिषद आमदार विपुल बजेरीया यांच्या विकासनिधीसह जिल्हा नियोजन समिती सन २०२२/२३ च्या आराखड्यात दलितेत्तर विकास योजने अंतर्गत तब्बल ०१ कोटी ५० लक्ष रुपयांची विकासकाम मंजूर झालेली असून या कामांतर्गत रविवार दि.०२ एप्रिल २०२३ रोजी विजय नगर परिसरात अत्यंत निकृष्ट सिमेंट रस्ता व सिमेंट नाली बांधकामास सुरुवात करण्यात आली असून या विकासकामावर मुख्याधिकारी नरळे प्रभारी नगर अभियंता गायकवाड व सब ओव्हरसियर दिपके यांचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी डायरेक पुर्वीच्या जुन्या संपूर्ण माती झालेल्या सिमेंट रोडवर एक इंची आबडधोबड पात्तळ गिट्टी मातीयुक्त रेती व सिमेंट मिश्रीत एक थर टाकून नवीन सिमेंट रस्ता तयार झाल्याचे नाट्य सोईस्कररित्या रंगवले जात आहे......


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या