🌟पुर्णेतील जनसामान्य गोरगरीब जनतेला राज्य शासनाचा दिलासा : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मंजूरी...!


🌟जिल्ह्यात सात दवाखान्यांना मंजूरी पुर्णेचाही समावेश🌟


पुर्णा (दि.३० एप्रिल) - पुर्णा शहरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता प्रथमतः पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष हाजी कुरेशी,सईद खान व यानंतर माजी नगरसेवक प्रविण अग्रवाल,शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते अंकीत कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची भेट घेऊन पुर्णा शहरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी याकरिता  लेखी स्वरुपात विनंती केली होती त्यांचा मागणीची दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मंजूरी दिली आहे.


परभणी जिल्ह्यात सात दवाखान्यांना मंजूरी देण्यात आली असून यात पुर्णेचाही समावेश असून महाराष्ट्र दिन १ मे २०२३ रोजी या दवाखान्याला सुरुवात होणार असून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरातील नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे या दवाखान्यामुळे शहरातील ३५ ते ४० टक्के गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या