🌟राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना जाहीर केलेली दीड हजारांची मानधन वाढ चालु एप्रिल महिन्यापासूनच मिळणार...!


🌟महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय जाहीर🌟

परभणी (दि.08 एप्रिल) : कुपोषण निर्मुलनाबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देणार्‍या अंगणवाडी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाने जाहीर केलेली दीड हजारांची मानधन वाढ चालु एप्रिल महिन्यापासूनच मिळणार आहे.

              यासंदर्भातील शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने जाहीर केला असून या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना आता सेवा कालावधीनुसार 10 हजार तेे 10 हजार 500 मदतनिसांना 5 हजार 500 ते 5 हजार 775 तर मिनी अंगणवाडी सेविकांना 7 हजार 200 ते 7 हजार 560 इतके मानधन मिळणार आहे. या मानधनवाढीचा राज्यातील सुमारे 2 लाख 7 हजार 961 अंगणवाडी कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. यात परभणी शहर व जिल्हयातील चार हजाराहून अधिक अंगणवाडी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

              तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांची मानधनवाढीची प्रमुख मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने बेदखल ठरविली होती. अनेकवेळा निवेदने दिली, निदर्शने केली, मोर्च काढले तरी शासनाला जाग आली नाही अखेर एक तर सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्या किंवा किमान मानधनात तरी वाढ करा, अशी मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचार्‍यांनी फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण राज्यभरात लढा पुकारला. अंगणवाड्या बंद ठेवुन कर्मचार्‍यांनी शासनाचे लक्ष वेधले. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या या लढयाला विरोधी पक्षानेही साथ देऊन विधानसभेतही आवाज उठविला. सरकारनेही त्यास प्रतिसाद दिला. अधिवेशनातच मानधनवाढीची घोषणा केली परंतु, ही मानधनवाढ कधीपासुन मिळणार याबाबत कर्मचार्‍यांत संभ्रम होता. आता शासन निर्णय निघाल्याने मानधनवाढीवर शिक्कामोर्तब झाले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या