🌟परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचितची एन्ट्री - बालासाहेब जगतकर


🌟वंचित बहुजन आघाडीच्या सौ.सत्वशीला प्रसेनजित रोडे यांचा अनुसूचित जाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल🌟                  

परळी (दि.03 एप्रिल) - परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित ने एन्ट्री केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.     

 याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच होऊ घातलेल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सदस्य मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सत्वशीला प्रसेनजित रोडे यांचा अनुसूचित जाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेंजित रोडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम भाऊ साळवे युवक तालुका अध्यक्ष राजेश सरोदे युवक तालुका महासचिव तथा ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गीते यांच्या मातोश्री गीते ताई ग्रामपंचायत सदस्य श्री पारसे साहेब ग्रामपंचायत सदस्य सौ सत्वशीला प्रसेनजीत रोडे तालुका युवक उपाध्यक्ष अवि मुंडे अनुरथ काजळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त हितचिंतक व मतदार  उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या