🌟परभणी येथील पुज्यनिय म.शं.शिवणकर मास्तरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी उभारली चळवळ...!


🌟परभणी मनपाने युनियन बॅंकेच्या चौकाला स्वर्गीय शिवणकर मास्तरांचे नाव देण्याचा ठराव केला पास🌟

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असलेल्या पुज्यनिय म.शं. शिवणकर मास्तरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाल विद्या मंदिर प्रशालेच्या माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांनी गेल्या काही महिन्यांपासून चळवळ उभी केली आहे या चळवळीला पहिले यश मिळाले आहे.

नानल पेठ येथील युनियन बॅंकेच्या चौकाला स्वर्गीय म. शं. शिवणकर मास्तरांचे नाव देण्याचा ठराव परभणी महानगर पालिकेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची लेखी प्रत आपल्याला मिळाली आहे म.शं.शिवणकर मास्तरांचे नाव अजरामर करण्याच्या दृष्टीने आपण सर्व जण या पुढेही असेच प्रयत्न करुया, असा निर्धार यावेळी  सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी उदयसिंग बायस परीक्षित वट्टमवार भगवान खैराजानी किशोर देशपांडे शिंदे सामाले माणिक चौधरी सुशील देशमुख दीपक टाक अभिजीत कुलकर्णी डॉ.सचिन पाठक अनिल शहाणे मंगेश बोरगावकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या