🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भाजपाला सोडचिठ्ठी🌟

✍️ मोहन चौकेकर

* सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर; सर्वोच्च न्यायालय आणि त्याची रजिस्ट्री बंद राहणार

* 34 जिल्हा परिषदांमध्ये होणारी महाभरती 19 सप्टेंबर 2022 रोजी रद्द झाल्याप्रकरणी परीक्षा फी राज्य सरकार परत देणार, 65 टक्के फी उमेदवारांना परत दिली जाणार

* आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  जगमोहन रेड्डी  ठरले सर्वात श्रीमंत (संपत्ती 510 कोटी) मुख्यमंत्री, Association for Democratic Reforms ने यादी केली जाहीर 

* महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; त्यांची संपत्ती होती 1.2 अब्ज डॉलर्स इतकी

* ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र केले दाखल परंतु ईडीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळले

* युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेंस्की यांचे मोदींना पत्र, औषधी आणि मेडिकल साहित्यासह अतिरिक्त मदत पाठवण्याची केली विनंती

* कर्नाटक निवडणूकीसाठी महाराष्ट्रातून भाजपचे 6 प्रचारक; मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश

* संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीचे 11 जूनला होणार प्रस्थान

* बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट

* मुलांचे कल्याण हे त्यांच्या आई-वडिलांच्या अधिकारापेक्षा जास्त महत्त्वाचे - मुंबई उच्च न्यायालय

* मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

* पुढील ५ दिवस कोकण, मराठवाडा, गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

* कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भाजपाला सोडचिठ्ठी, अथणीतून उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा

* म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला, लहान मुले व महिलांसह 100 लोकांचा मृत्यू

* पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर उतारा, १३६ किमीचा रिंग रोड, पाच तालुके जोडणार

* कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना दोन लाख देण्याचे केले जाहीर*

* कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी सोमवारी सांगितलं की त्यांचा पक्ष शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना दोन लाख देईल. त्यांची ही नवी मोहीम सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

* भाजपाने कर्नाटकची यादी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांना तिकीट नाही याआधी गुजरातमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही तिकीट दिलं नाही

* प्रत्येक वाडीवस्तीपर्यंत पोचलेली लालपरी, एवढ्या गाड्या, चालक-वाहक, साधने असताना तोट्यात का ?

* आपली एसटी गाड्या १५६३३ अधिकारी कर्मचारी ९० हजार एकुण डेपो २५२ रोजचे प्रवासी ३३ लाख रोजचे उत्पन्न १६ कोटी खर्च २६ कोटी दररोज १० कोटी तोटा

* जिल्हा परिषद भरती रद्द केलेल्या भरतीचे परीक्षा शुल्क उमेदवारांना माघारी मिळणार :-

* जिल्हा परिषद भरती २०१९ व २०२२ ला रद्द केलेल्या भरतीचे परीक्षा शुल्क उमेदवारांना माघारी मिळणार : जमा शुल्क ३३.३९ कोटी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना २१.७० कोटी रु पाठवलेत सर्व जिल्हा परिषदांनी बेरोजगारांचे परीक्षा शुल्क तातडीने देण्याची कार्यवाही सुरू करावी

* बार्टीची पीएचडीसाठी देण्यात येणारी फेलोशिप बंद : बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने पीएचडीसाठी देण्यात येणारी फेलोशिप बंद करण्यात आल्याने बहुजन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करण्यापासून वंचित राहणार आहेत. हे विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रचंड…

* क्लस्टर शेतीसाठी पाच खाजगी कंपन्यांना केंद्र सरकारची परवानगी* 

* फळ शेतीसाठी निवडलेल्या पाच कंपन्यांमध्ये देसाई अग्रीफार्म, एफआयएल इंडस्ट्रीज, नाशिकची सह्याद्री फार्म्स, मेघालय बेसिन मॅनेजमेंट एजन्सी आणि प्रसाद सीड्स यांचा समावेश

* भारतीय उत्पादनाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रात विशेष फलोत्पादन पिकाच्या क्लस्टर लागवडीसाठी पाच खाजगी कंपन्यांना परवानगी दिली आहे.

*देशातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश : देशातील ३० पैकी २९ म्हणजे ९७ टक्के मुख्यमंत्री कोट्यधीश असून, यादीत ५१० कोटी रुपयांच्या संपत्तीसह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे आघाडीवर आहेत तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे १५ लाख रुपयांची संपत्ती आहे.

* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ११ कोटींची संपत्ती असल्याची माहिती ADR ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील मुख्यमंत्र्याच्या संपत्तीविषयीची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस संस्थेकडून बुधवारी (दि.१२) देण्यात आली आहे.

* कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरु: पुढील 90 दिवसांमध्ये 60 ते 70 लाख लसींचे उत्पादन होणार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची माहीती

* अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा: 19 एप्रिल पर्यंत ईडीद्वारे कोणतीही कारवाई केली जाणार नाही; माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोलीमधील बेकायदा हॉटेल बांधकामप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप

* अभिनेता संजय दत्त जखमी : अभिनेता संजय दत्त एका शुटिंगदरम्यान जखमी, कन्नड फिल्म 'केडी: द डेविल' च्या बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या सीनवेळी हात-चेहऱ्यावर जखमा

* शेअर बाजार: सेन्सेक्समध्ये 235 अंकांची वाढ होऊन 60,392.77 वर झाला बंद, तर निफ्टी 90 अंकांनी वधारत 17,812.40 वर झाला बंद

* पंजाबमधील लष्करी कॅम्पमध्ये गोळीबार: पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी कॅम्पमध्ये धक्कादायक घटना, पहाटे 4.35 वाजता गोळीबारात 4 जवान शहीद 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या