🌟पुर्णा शहरातील अनेक वसाहतीतील रहिवासी नागरिक स्वच्छते अभावी भोगताय नरखयातना...!


🌟नगर परिषद प्रशासनाचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा उजागर : जागतिक मलेरीया दिवस असतांनाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष🌟


पुर्णा शहरातील नागरिकांचे 'स्वच्छ शहर,सुंदर शहराचे' स्वप्न संपुर्णतः भंगवण्याचे महापाप तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि भ्रष्टाचारात संपुर्णपणे बरबटलेल्या अधिकाऱ्यांनी सोईस्कररित्या भंगवल्यामुळे शहरातील अनेक भागात राहणारे रहिवासी नागरीक आज परिसरातील अस्वच्छतेमुळे अक्षरशः नर्खयातना भोगत असल्याचे दिसत आहे राज्य शासनासह केंद्र शासना स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत असतांना हा कोट्यावधी रुपयांचा निधी शेवटी महाचोरांच्या घशातच जात असल्यामुळे शहरातील अनेक भागातील अस्वच्छता मलेरीया,डेंग्यू,टायफाईड,काविळ सारख्या भयंकर जिवघेण्या आजारांना निमंत्रण देत असून शहरात या संसर्गजन्य आजाराला कोणी बळी पडल्यास यास संपुर्णतः नगर परिषद प्रशासनाला जवाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येवू नए ? असा प्रश्न आता जोर धरू लागला असून आज मंगळवार दि.२५ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण जग 'जागतिक मलेरीया दिवस' साजरा करीत असतांना मात्र निर्लज्ज पुर्णा नगर परिषद प्रशासनाला मात्र जागतिक मलेरीया दिवसाचा देखील विसर पडल्याचे दिसत असून शहरात सर्वत्र घाण कचऱ्याची ढिगार तुंबलेल्या नाल्यांसह यातील परिसरात वाहणारे अस्वच्छ पाणी डासांना पोषक आहार देऊन डासांची प्रचंड संख्या वाढवून मलेरीया सारख्या रोगांची निर्मिती करीत असतांना नगर परिषद प्रशासन व स्वच्छता विभाग धृतराष्ट्राची भुमिका साकार करून शहरातील संसर्गजन्य रोगांना आकार देत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पुर्णा शहरातील मस्तानपुरा नई आबादी,अजीज नगर,गवळी गल्ली,आनंद नगर,महाविर नगर,डोबी गल्ली,कोळी गल्ली,धनगर वाडा,अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,अली नगर,क्रांती नगर परिसरांसह अनेक भागांतील नागरी वसाहतींमधौये पसरलेल्या भयंकर घाणीच्या साम्राज्याला या परिसरातील नागरीक अत्यंत वैतागून गेले असून परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास नगर परिषद प्रशासन सर्वस्वी जवाबदार आहे कारण या संदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊन देखील नगर प्रशासनातील अकार्यक्षम अधिकारी या तक्रारींची दखल घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे मस्तानपुरा,नई आबादी परिसरात तर नगर परिषद स्वच्छता विभागाने मागील अनेक महिन्यांपासून स्वच्छता केली नसल्यामुळे परिसरातील नाल्या तुड़ुब भरून रोडवर पाणी जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना विविध संसर्गजन्य आजारांनी ग्रासले असल्यामूळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले शहरातील अनेक भागात स्वच्छते अभावी रोग राई पसरलेली असून या परिसरातील ४०% लोक हे विविध आजाराने ग्राससे असून मागीलकाळात डेॅग्यू सारख्या भयंकर आजाराने दोन जनांना आपले जिव गमवावे लागले आहे. एवढे होवून सुध्दा नगर परिषद प्रशासन हे जाणिव पूर्वक शहरातील मागासवर्गीय अल्पसंख्याक बहुल परिसर असल्याने त्या परिसरांमध्ये स्वच्छताकडे दुर्लक्ष करीत आहे.


शहरातील मस्तानपुरा नवी आबादी परिसरातील लोकांच्या आरोग्याशी नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक खेळ तर खेळत नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित होत असून या भागात जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक कन्या शाळा असून शालेच्या आसपास मोठ्या प्रमाणात साचलेल्या घाणीमुळे शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थीनींचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे.यापुर्वी शाळा प्रशासना मार्फत वेळोवेळी तक्रार अर्ज देण्यात आले परंतू त्या तक्रार अर्जांची देखील नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कार्यवाही केली नसल्यामुळे नगर परिषद प्रशासनाची निष्क्रियता उघड होत आहे या संदर्भात या परिसरातील जागृक नागरिक शेख जुबेर शेख हबीब व ओम गायकवाड यांनी स्वच्छता विभागाचे निरिक्षक नईम पठाण यांच्याशी संपर्क केला असता हे सेक्शन माझ्याकडे नाही असे म्हणुन नईम पठाण यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन आपली जवाबदारी झटकली त्यानंतर त्यांनी याच विभागाशी संबंधित दिपक भालेराव यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की माझ्याकडे कर्मचारी नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा अश्या प्रकारचे उध्दटपणे बोलून त्यांची तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे नगर परिषदेचे मुख्यधिकारी नरळे यांची बदली झाल्यामुळे नगर परिषदेचा कारभार बेवारस झाल्याचे निदर्शनास येत असून ऐन रमजान ईद/महात्मा बसवेश्वर जयंती अक्षयतृतीया या महत्वाच्या सनांला देखील कोणत्याही प्रकारची स्वच्छता तर करण्यात आलीच नाही त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे आज दि.२५ एप्रिल रोजी जागतिक मलेरीया दिवस असतांना देखील शहरातील स्वच्छतेचा नगर परिषद प्रशासनाला विसर पडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे......... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या