🌟परभणीत भारतीय रोजगार मोर्चा तर्फे 'बेरोजगारों की संसद' भरणार....!


🌟भारतीय रोजगार मोर्चा नवी दिल्लीचे राष्ट्रीय प्रचारक डॉ.विलास खरात हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार🌟

परभणी (दि.०१ एप्रिल) - देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले तरी भारतामधील बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही,युवकांना रोजगार मिळत नसल्यामुळे ते निराशेच्या छायेत  वावरत आहेत. बेरोजगारांच्या प्रश्नावर भारतीय बेरोजगार मोर्चा तर्फे संपूर्ण देशभर 'बेरोजगारों की संसद ' हे अभियान राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सहाही विभागात होत असलेल्या  बेरोजगारांची संसद मराठवाड्यातील परभणी मध्ये होत आहे.4 एप्रिल 2023 मंगळवार रोजी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत येथील शनिवार बाजार मधील हरिप्रसाद मंगल कार्यालयामध्ये 'बेरोजगारांची संसद' भरणार आहे.

भारतीय रोजगार मोर्चा नवी दिल्लीचे राष्ट्रीय प्रचारक डॉ.विलास खरात यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बेरोजगार संसदेचे,स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे संचालक प्रा. विठ्ठल कागणे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.यावेळी बेरोजगारांची संसद मध्ये प्रमुख वक्ते म्हणून  भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी मा सिद्धांत मौर्य,राष्ट्रीय संयोजक विकी बेलखेडे,राज्य संयोजक मा.सटवाजी नखाते,महाराष्ट्र कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष आर. बी. जाधव, प्रा रफिक शेख सर परभणी,एंगडे बायोलॉजी क्लासेस नांदेड मा.एंगडे सर,मा.प्रकाश नवनाथ उजगरे बीड.हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते ॲड.कृष्णा तिडके,पीपल्स कॉलेज नांदेडचे प्रा.प्रमोद वाघमारे,अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोलीचे संचालक प्रा गौतम सूर्यतळ,कवी व्याख्याते कृषी विद्यापीठ परभणीचे पांडुरंग गणपत वागतकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पी.एच.डी.संशोधक गजानन बोथीकर हे उपस्थित राहणार आहेत.

तर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगड हिंगोली चे जिल्हाध्यक्ष शिवश्री नामदेव कर्‍हाळे,नॅशनल भीमसेनेचे मराठवाडा अध्यक्ष मा.संदीप थोरात,रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष मा.किरणभाऊ घोंगडे,भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.दुर्गेश मौर्य,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा संभाजीनगर हायकोर्टाचे मा.ॲड.शिरीष कांबळे,राष्ट्रीय किसान मोर्चा लातूरचे युवा किसान नेते मा.दीपक इंगळे,शेकाप मध्यवर्ती समितीचे राज्य सदस्य मा.भाई मोहनराव गुंड,शिवस्वराज्य बहुजन सेना महाराष्ट्राचे सरसेनापती मा.धम्मपालसिंह राजे कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे संपूर्ण भारतात व महाराष्ट्रातील सहा विभागात बेरोजगारों की संसद आयोजित होत आहे.

मराठवाडा विभागाची "बेरोजगारों की संसद"परभणी येथे होत आहे.तरी या बेरोजगारांच्या संसद चर्चा सत्रात सर्व बेरोजगार,युवक,युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ही बेरोजगारांची संसद यशस्वी करावी असे आवाहन,"भारतीय बेरोजगार मोर्चा युनिट परभणी" यांचे वतीने केले आहे.

संपर्क: 9518748414,

9665555467,9112121999

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या