🌟जिंतूरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात सम्पन्न....!



🌟अयोध्याबाई तोषनीवाल ह्यांच्या 15 व्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ शिबिराचे आयोजन🌟

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर शहरातील चैतन्योदय गुरुकुल आश्रम येथे स्व.आयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट जिंतूर व उदगीर लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 वार सोमवार रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असता एकूण 217 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 138 रुग्णाची निवड करण्यात आली असता त्यातील 113 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथे रवाना झाले आहेत.

   या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ह भ प संदीपजी महाराज शर्मा उद्घाटक पोलीस निरीक्षक कुंदन कुमारजी वाघमारे,रमेशजी दरगड,गोविंदप्रसादजी पोरवाल, पुरुषोत्तमजी पोरवाल,डॉ सचिनजी निलंकर,डॉ. सुरेशजी तिवाडी, पत्रकार शकील अहमद पत्रकार शहेजाद पठाण, मुख्याध्यापक गजानन तिखे सर उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ब्रिजगोपालजी तोष्णीवाल  मानले की स्व.आयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट जिंतूर व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यंत 3700 नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या तर  उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाने आजपर्यंत 1 लाख 65 हजार यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत तसेच समाजकार्य म्हणून अपंगा करता शस्त्रक्रिया कृत्रिम अवयव देखील बसविले आहेत.

    याप्रसंगी पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी ट्रस्टच्या कामाचे कौतुक करीन जास्तीत जास्त नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असे आव्हान केले तर ह भ प संदीपजी शर्मा यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात समाजासाठी काहीतरी देणे आहे मात्र देण्याची प्रवृत्ती सगळ्यांची नसते त्यामुळे समाजात समाज कल्यानासाठी दाते उत्तम कार्य साधणारे नागरिक निर्माण होणे ही काळाची गरज आहे. रमेशजी दरगड यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे स्पष्ट केले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चोपडे तर आभार ज्ञानदेव कुदळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन घुगे,राहुल घुगे,दिनकर मस्के,परसराम घंदारे, स्वप्निल येरमवार,गणेश रुघे,शिवाजी काकडे,प्रदीप राठोड,रामप्रसाद राखे,प्रसाद घुगे,मदन मोरे, सुभाष देशपांडे,गजानन अंभोरे,संजय साबळे,वसंत राठोड,प्रकाश खोरगडे, ज्ञानबा तडस यांनी रमणजी तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम बघितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या