🌟परभणी शहरात व प्रत्येक वॉर्डात सर्व ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी देऊन सर्व निर्बंध हटवावे...!


🌟शांतता समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांकडून मागणी🌟

परभणी (दि.०८ एप्रिल) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न, संविधानाचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे लोकशाही चा सर्वात मोठा उत्सव असून या निमित्त शहरात व प्रत्येक वॉर्डात सर्व ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी देऊन सर्व निर्बंध हटवावे अशी मागणी रिपब्लिकन सेने चे राज्य उपाध्यक्ष बैठकीत बोलताना केली तसेच या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्त निघणाऱ्या मिरवणूकीस 2 तासाचा वेळ वाढवून मिळावा.मिरवणुकीच्या मार्गवरील सर्व खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाकोडे यांनी केली.

ही बैठक जिल्हाधिकारी सौ आचल गोयल यांच्या अध्यक्षते खाली झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षक रागसुधा, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदिची उपस्थिती होती बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले बैठकीत रिपाई नेते डी.एन.दाभाडे,मोलाना रफि्योद्दीन आश्रफी,सुभाष जावळे,माजी नगराध्यक्ष पाशा भाई, संजय बगाटे, सचिन आंबीलवादे,राणूबाई वायवळ आदींनी विचार मांडले.

या बैठकीत मनपा आयुक्त यांनी सांगितले की महापुरुषांचे बॅनर लावण्यासाठी शहरा मध्ये 130 ठिकाणाची निवड केली आहे या साठी समन्वयक अधिकारी यांची नियुक्ती केली जाणार आहे त्यांच्याकडे परवानगी चा अर्ज देऊन बॅनर लावावे या बैठकीचे अध्यक्ष आचल गोयल यांनी महापुरुषांच्या जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्था चे पालन करावे अशे आव्हान केले या बैठकीत सुधीर कांबळे, प्रदीप वाहूळे, उमेश लहाने,सुदाम तुमसमीनदार, नागेश सोनपसारे उमेश लहाने सह सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या