🌟परभणीची तांडुर रेलवे अधिकाऱ्यांनी नातेवाईकाच्या सोयीसाठी पळवली....!

🌟विचित्र पणे वेळापत्रक जाहीर करून चक्क ही गाडी पळवून नेल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे🌟       

परभणी (दि.२६ एप्रिल) - कोविड काळात सुरू झालेली परभणी - तांडुर रेल्वेला येथून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना केवळ आपआपले नातेवाईकांच्या सोयीसाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी ही गाडी विचित्र पणे वेळापत्रक जाहीर करून चक्क ही गाडी पळवून नेल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे.

या बाबत दमरेच्या नवीन व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना च्या नंतर परभणी-हैदराबाद दरम्यान एक विशेष दैनंदिन रेल्वे चालविली सदर रेल्वेला काही दिवसांतच मिळालेल्या भरपूर प्रतिसादाने या विशेष रेल्वेचे आरक्षण तिकिट देखील मिळत नव्हतं. तरी देखील सदर रेल्वे ला अचानक पणे परभणी ते नांदेड दरम्यानच्या प्रवास रद्द करून परभणी ऐवजी नांदेड येथून सुरू करून परभणी येथील प्रवाश्यांना अडचणीत आणलं, त्यावर नांदेड-तांडूर-परभणी दैनंदिन रेल्वे ला सवारी रेल्वे प्रमाणे सर्व स्थानकावर थांबताना देखील एक्सप्रेसच्या नावाखाली दुप्पट भाडे वसूल करून  चालविण्यात येत आहे. संपूर्ण भारतात कोणत्याही रेल्वे अखेरचा स्थानक पहोचल्यावर परत निघताना त्याच स्थानकावरूनच सुटते. तांडूर-परभणी ह्या एकमेव रेल्वेला विचित्र प्रकारे परत निघताना परभणी ऐवजी नांदेड येथून सोडले जात आहे. मराठवाडा विभागात प्रवाश्यांना मिळत असलेल्या किमान सुविधा देखील बंद करण्यात येत आहे. अनेक वेळा प्रवाशी महासंघाने तांडूर-परभणी ला परतीत परभणी येथून सुरू करण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली असता नांदेड येथील अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

आणखी एक  षडयंत्र म्हणजे परभणी येथून रात्री 8.20 ला निघणारे मराठवाडा एक्सप्रेस तसेच 8.30 ला निघणारी बेंगलूरू-नांदेड या दोन्ही रेल्वे गाड्यांना केवळ 58 किलो मीटर अंतरावर नांदेड येथे पोहचण्यासाठी तासी 25 किमी च्या कासवगतीने सव्वा दोन ते अडीच तासाचा कालावधी असताना देखील नांदेड येथून 10.40 चा नांदेड-तंडूरू रेल्वेला कनेक्शन पासून वंचित करण्यात येत आहे. मुद्दामहून एक-दूसरं गाड्यांची कनेक्शन तोडून रेल्वे प्रशासनाने स्वतःचे नुकसान करून घेताना परभणी येथील प्रवास्यांना अनंत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तांडूर रेल्वे बाबतीत वरील अन्यायाची दखल घेऊन रेल्वे अधिकार्यांनी नांदेड-तंडूरू रेल्वेला परभणी येथून सोडावे, तीन महिन्यापूर्वी घोषित केल्या प्रमाणे तांडूर रेल्वे ला तांडूर च्या पुढे रायचूर पर्यंत वाढवून येताना रायचूर-परभणी तर परत निघताना परभणी-रायचूर दरम्यान चालविण्यात यावेत, बेंगलूरू-नांदेड रेल्वेला नागपूर पर्यंत विस्तरून सदर रेल्वेचा तीन तासाच्या लूज टाईम रद्द करून सदर रेल्वेला परभणी येथे सायंकाळी 7, नांदेड येथे रात्री 8 आणि नागपूर येथे सकाळी सुमारे 4 ते 5 चा दरम्यान पोहोचविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, मंगला ताई मुदगलकर, डाॅ. राजगोपाल कालानी, रूस्तुम कदम,श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित, खदीर लाला हाशमी,बाळासाहेब देशमुख,अनिल देसाई, नारायणराव तिथे,विठ्ठल काळे,दतात्र्य कराळे इत्यादींनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या