🌟परभणी येथील धार रोडवर भिमाकोरेगाव नगर फलकाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण...!


🌟भिमाकोरेगाव नगर कडे जाणारा मार्ग दर्शविणाऱ्या फलकाचे लोकनेते विजय वाकोडे यांच्या हस्ते उदघाटन🌟

परभणी (दि.०१ एप्रिल) : शहरातील धार रोड येथील भिमाकोरेगाव नगर कडे जाणारा मार्ग दर्शविणाऱ्या फलकाचे विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी मोठ्या थाटा माटात जल्लोषात अनावरण करण्यात आले आहे. 

    अधिक माहिती अशी की परभणी शहरातील धार रोड येथील भिमाकोरेगाव नगर कडे जाणारा मार्ग दर्शविणाऱ्या फलकाचे लोकनेते विजय वाकोडे, जनसेवक धम्मदिप रोडे, यांच्या हस्ते व सतीश भिसे, विश्वजित वाघमारे, प्रमोद अंभोरे, वसीम मोमीन, सय्यद अनवर, आशिष वाकोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले. 

    या वेळी भीमराव वायवळ, संदीप वायवळ, प्रेम तूपसमुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी, शेख अझहर, सिद्धांत सूर्यवंशी, सुबोध तूपसमुंद्रे, सूरज गायकवाड, सुनील शिंदे, स्वप्नील कांबळे, कृष्णा निखाते, रितेश फूनसे, अभिषेक परदे, बबन वावळे, संजय शिवभगत, विठ्ठल कणकुटे, व नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमाकोरेगाव मित्र मंडळाने परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या