🌟समाजहित अभियान भिम जयंती उत्सव समिती व फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचा कौतुकास्पद उपक्रम...!


🌟संयुक्त विद्यमाने आयोजित 18 तास अभ्यास अभियान कार्यक्रम संपन्न🌟

परभणी (दि.13 एप्रिल) - शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान आयोजित समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 एप्रिल रोजी परभणी शहरातील पंचशील बुद्ध विहार, डॉ.आंबेडकर नगर येथे 18 तास अभ्यासिकाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासीकेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

   यावेळी प्रा.यशवंत मकरंद, प्रा.संजीव आढागळे, मिलिंद बामणीकर, ग्रामसेवक बनसोडे, पत्रकार अमर गालफाडे, संदिप लहाने, समाजहित जयंती चे स्वागताध्यक्ष कावळे मामा, प्रमोद अंभोरे, शेख अझहर यांची उपस्थिती होती. 

    हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती उत्सव समिती चे मुख्य समन्वयक प्रमोद अंभोरे, अध्यक्ष आकाश साखरे,  स्वागताध्यक्ष कावळे मामा, रमेश घनघाव, कोषाध्यक्ष शेख अझहर, सर्व धर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती चे समन्वयक प्रा. यशवंत मकरंद, सुनील ढवळे, डॉ. सुनील जाधव, संजीव अढागळे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई शीरसे, प्रकाश अंभोरे, आलोक शिरसे,  आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या