🌟समाजहित अभियान डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या स्वागताध्यक्ष पदी स्वच्छ्तादुत कावळे मामा.....!


🌟स्वागताध्यक्ष पदी त्यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा प्रतिष्ठान कार्यालयात सत्कार🌟


परभणी (दि.०४ एप्रिल):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येत असते त्या अनुषंगाने परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे व सचिव जनसेवक रमेश घनघाव यांच्या मुख्य समन्वयातून व प्रवर्तक प्रा. राजकुमार मनवर, आकाश साखरे यांच्या अध्यक्षतेखाली  साजरी करण्यात येणार आहे.

 त्या अनुसार दिनांक 4 एप्रिल रोजी प्रतिष्ठान कार्यालय, डॉ. आंबेडकर नगर येथे प्रमोद अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते स्वच्छते साठी अहोरात्र मेहनत घेणारे संत गाडगे बाबा यांच्या मार्गावर चालणारे गावो गावी जाऊन स्वच्छ्ता करणारे स्वच्छ्तादुत कावळे मामा (कमळाजी कावळे)  यांची समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2023च्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तसेच स्वागताध्यक्ष पदी त्यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा प्रतिष्ठान कार्यालय आय.टी.आय कॉर्नर, डॉ. आंबेडकर नगर, जिंतूर रोड  परभणी येथे सत्कार करण्यात आला. 

या वेळी जयंती समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद अंभोरे, जनसेवक रमेश घनघाव, जयंती समिती अध्यक्ष आकाश साखरे, उपाध्यक्ष रमाताई घोंगडे, अजय शिराळे, हरदिप सिंग बावरी, कोषाध्यक्ष शेख अझहर, विकास जमधाडे, सहसचिव शंकर बनसोडे, दीपक बनसोडे, विनोद वाडेकर, रेखाताई कांबळे, सरीताताई अंभोरे, संघटक संदीप वायवळ, आकाश राक्षे, अब्दुल रहमान खान, वंदनाताई खिल्लारे, सविताताई घोगरे,  सल्लागार प्रा. यशवंत मकरंद, भूषण मोरे, सुनील ढवळे, अमर गालफाडे, संभाजी पंचांगे व मार्गदर्शक संघपाल अढागडे, बाळू भाऊ घिके, बालाजी कांबळे, सय्यद जमील, रियाज खूरेशी, राजू कर्डिले, आणि सदस्य प्रेम तुपसमुंद्रे, अजय नंदपटेल, राहुल घोंगडे, मिलिंद मस्के, सिद्धांत सूर्यवंशी, प्रकाश अंभोरे, शुभम कोरडे, बंटी गायकवाड, अमर कोडगिर, मुन्नी बाई शिरसे, जया निकाळजे, वैभव गायकवाड आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या